त्वचारोग : गजकर्ण किंवा बुरशीजन्य आजार पसरण्यास अनेक घटक कारणीभूत असतात.त्यातला पहिला घटक म्हणजे वातावरण. उष्ण आणि दमट हवामानात हा आजार जास्त प्रमाणात पसरतो. कोकण आणि मुंबईचं वातावरण तर या आजाराला खूपच पोषक आहे. मुंबईचा पेशंट आला की मी नेहमी त्याची चेष्टा करतो.म्हणतो, ‘मुंबई सगळ्या बाजूंनी चांगली आहे पण तिला सर्वांत मोठा धोका आहे तो अतिरेक्यांचा आणि गजकर्णाचा.’ दमट आणि उष्ण हवामानात येणाऱ्या घामामुळे आपलं अंग बराच काळ ओलं राहतं आणि त्या ओलसरपणामुळेच हा आजार पसरतो.
जीन्स हा खरंतर आपला पोशाख नाही.
आपण ज्या वातावरणात राहतो ते वातावरण तर आपण बदलू शकत नाही. कामाचं राहण्याचं ठिकाणही बदलू शकत नाही. अशा वेळी आपण काय करू शकतो? यावर एक साधा सोपा उपाय आहे आपला पोशाख या वातावरणाला अनुसरून घालावा. मी बऱ्याचदा बघतोय की आजकाल तरुण तरुणीच काय म्हातारीकोतारी माणसंही जीन्स कपडे घालतात.
जीन्स हा खरंतर आपला पोशाख नाही. कारण एकतर त्याचं कापड खूप जाड असतं आणि जीन्स ही शक्यतो एकदम आवळ असते. अशा कपड्यांमध्ये माणूस घामेघूम होणार हे ओघानं आलंच. जीन्स कपडे चालतात ते फक्त हिवाळ्यात आणि थंड हवामानात.
पण आपण काय घालावं याचा आपण कधी विचारच करत नाही. आपण कपडे घालतो ते असतं केवळ अंधानुकरण. इतर देशातले लोक त्यांच्या हवामानाला आणि आरोग्याला साजेसे कपडे घालतात आणि आपण त्यांचे कपडे फॅशन म्हणून वापरतो. भर दुपारी दोन वाजता काळे कुट्ट कपडे किंवा बुरखे घालून फिरणारे लोकही कमी नाहीत.
नायलॉन, टेरिलीन,टेरिकॉटचे कपडे चालणार नाहीत.
माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला माझी प्रथम सूचना असते की नो लेगिन्स, नो जेगिन्स अँड नो जीन्स. उष्ण आणि दमट हवामान असणाऱ्या प्रदेशातल्या लोकांनी सैल आणि सुतीच कपडे वापरले पाहिजेत. नायलॉन, टेरिलीन,टेरिकॉटचे कपडे चालणार नाहीत.
उन्हात काम करणाऱ्या लोकांनी सैल, सुती कपडे तर घातलेच पाहिजेत पण शुभ्र कपडे घातले पाहिजेत.
काळे किंवा भडक कपडे उन्हातली उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळं जास्त त्रास होतो.
याउलट शुभ्र पांढरे कपडे ऊन परावर्तित करतात.
कडक उन्हात काळेकुट्ट अंगाला चिकटून बसणारे कपडे परिधान करणारे लोक पाहून मला खूप आश्चर्य वाटतं!
गजकर्ण झालेल्या व्यक्तीने ओले कपडे परिधान करू नयेत. शरीराला वरचेवर पाणी लावू नये.
ओलसरपणामुळे बुरशी वाढतच जाते. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वॉटरकुलर वापरू नये.
शरीर नेहमी स्वच्छ आणि कोरडे राहील याची काळजी घ्यावी.
बाधित व्यक्तीने स्वतःचे कपडे इतर लोकांच्या कपड्यांबरोबर न धुता वेगळे धुवावेत आणि ते उलटे करून उन्हात वाळवावेत.
कारण हा आजार एकत्र कपडे धुण्यामुळेही पसरतो. ज्यावेळेपासून लेगिन,
जेगीन,जीन्स आणि काळे बुरखे वापरण्याची पद्धत आलेली आहे तेव्हापासूनच हे आजार वाढू लागलेत हे सांगणे नकोच.
by डॉ.अशोक माळी,
माळी त्वचारोग क्लिनिक, मिरज.
(पोस्ट आवडल्यास शेअर करू शकता.)
अगोदर आणि नंतरचा फोटो
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)