गाझियाबाद: अलीकडच्या काळात देशात धार्मिक आणि जातीय अस्मितेच्या मुद्यावरून लोकाना मारहाण करण्याचे तसेच झुंडीने येवून लोकांचे जीव घेण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे चिंताजनक चित्र समोर आले. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.गाझियाबाद मंदिराजवळ मांसाहार करत असल्याच्या संशयातून तिघांनी २२ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. बेदम मारहाण झाल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गाझियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार गंगानहार घाट येथील मंदिर परिसरात प्रवीण सैनी हा त्याच्या दोन मित्रांसह खाद्यपदार्थ खात होता. त्यावेळी दोन जण तिथे पोहोचले. त्यांनी प्रवीण आणि त्याच्या मित्रांशी वाद घातला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. आणि त्यातच प्रवीण सैनी यांचा मृत्यू झाला.मात्र या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली.
प्रवीण सैनी मंदिराजवळ मांसाहार करत नव्हता. तो मित्रांसोबत सोया चाप आणि चपाती खात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र आरोपींना तो मांसाहार करत असल्याचा संशय आला. त्यातूनच वादाला तोंड फुटलं आणि त्याचं पर्यावसान हाणामारीत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
‘आरोपी मद्यधुंद स्थितीत होते. प्रवीण आणि त्याच्या मित्रांना त्यांनी काठी आणि रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली. मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यांनी तिघांशी वाद घातला.आम्ही तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती सर्कल अधिकारी कमलेश नारायण पांडे यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन भारतीय सैन्यात कार्यरत असून तो सध्या सुट्टीवर असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
हेही वाचा..सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा; अनेकांना अटक
या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजदेखील हाती आलं आहे.
मारहाण होण्याआधी त्यांच्यामध्ये अर्धा तास शाब्दिक बाचाबाची झाल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपी नितीनसोबत असलेल्या त्याच्या दोन साथीदारांची ओळख पटली आहे.
दोघेजण मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रवीण आणि त्याच्या मित्रांना मारहाण केल्यानंतर तिघे घटनास्थळावरून स्कूटरनं फरार झाले.
‘रेस्टॉरंटच्या बिलवरून प्रवीण आणि त्याचे मित्र सोया चाप खात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आम्ही तीनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास प्रलंबित आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 04 , 2021 18: 18 PM
WebTitle – Ghaziabad beating a man to death outside a temple on suspicion of eating non-vegetarian 2021-07-04