1 CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!
(मराठी बातम्या) देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. मात्र, ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठीच्या पद्धतील आव्हान देणारी याचिका देखील न्यायालयाने यावेळी फेटाळून लावली.CBSE, ICSE 12th Exams
2 मराठा आरक्षण : ठाकरे सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; संभाजीराजेंनी दिली माहिती
(मराठी बातम्या) मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, आता याबाबत राज्य शासनाच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.“मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची केलेली प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.” अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.
3 सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
(मराठी बातम्या) सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. (By-elections of 5 Zilla Parishad, 33 Panchayat Samiti in Maharashtra) न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा
4 मुंबई महापालिकेत 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी तत्वावर भरती, 30 हजार ते 2 लाखांपर्यंत वेतन
(मराठी बातम्या) कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने देखील कोरोना तिसऱ्या लाटेचा समाना करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये विविध जम्बो कोविड सेंटर्ससाठी डॉक्टर्स, परिचारिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही नेमणूक तीन महिन्यांच्या कालावधीकरिता करण्यात येणार आहे. सुमारे 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येईल.( BMC invited applications for contract base post in jumbo covid center)
अर्ज कसा सादर करायचा?
मुंबई महापालिकेच्या covid19mcgm@gmail.com या किंवा stenodeanl@gmail.com
या ई-मेलवर पात्र उमेदवारांनी प्रमणापत्रांच्या प्रतींसह 26 जून 2021 पर्यंत 4 वाजता अर्ज करणं आवश्यक आहे.
5 BJP and Shiv Sena: ‘भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास नवल वाटायला नको’; भाजप नेत्याचे वक्तव्य
(मराठी बातम्या) काही दिवसांपूर्वी शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे भाजप नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता भाजप-शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातील वक्तव्य आपल्याच भूमिकेला छेद दिला आहे. शिवसेनेविरोधात शड्डू ठोकत उभे ठाकलेल्या बावनकुळे यांनी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे.माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले आहे.
6 शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रमंच (Rashtra Manch) संघटनेने ही बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती.
7 जहाल माओवादी हरिभुषणाचा जंगलात मृत्यू, 1 कोटींचं होतं बक्षीस!
गडचिरोलीच्या माओवादी (maoist ) प्रभावीत भागात जहाल माओवादी नेता हरिभुषणचा (haribhusan) मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एक कोटींचं बक्षीस होते. हरिभुषणला कोरोनाची (corona) लागण झाली होती. गेल्या 27 मेपासून चार जहाल माओवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.हरिभुषण हा चार राज्याच्या माओवादी प्रभावित भागात सक्रीय होता. त्यामुळे त्याच्यावर दंडकारण्यात एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सोमवारी सुकमा जिल्ह्याच्या जंगलात ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती दिली. पोलीस दलावर हल्ल्यासह अनेक मोठ्या हिंसक घटनांमध्ये हरिभुषण सुत्रधार होता.
8 खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिली आहे.
राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं.तसेच दोन लाखांचा दंडही ठोठावला होता.
जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर प्रतिक्रीया देतांना नवनित राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
त्या म्हणाल्या होत्या.
”या प्रकरणात कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. गेले ८ ते ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. अचानक न्यायालयाचा निर्णय येणं म्हणजे यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली आहे” नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘मोची’ जातीची असल्याचा त्यांचा दावा खोटा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केला होता.
Navneet Rana caste certificate case
9 उद्धव ठाकरे यांचा काळा पैसा परदेशात; रवी राणांचा गंभीर आरोप
खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
जात प्रमाणपत्र प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय.
या संदर्भात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप
+ उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे.
+ हॅाटेल, घर स्वरूपात विदेशात संपत्ती कमावली आहे.
+ माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे आहेत.
+ ईडी आणि सीबीआय कडे पुरावे देणार.
+ आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
झी 24 तासने ही बातमी दिली आहे.
10 धक्कादायक ! मुंबईतील या रुग्णालयात उंदरांनी कुरतडले रुग्णाचे डोळे
घाटकोपरच्या ( Ghatkopar ) राजावाडी रुग्णालयातील ( Rajawadi Hospital ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांनी हा आरोप केल्यानंतर रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूजवर, आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे.
लेटेस्ट बातमी – ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 22, 2021 19: 00 PM
WebTitle – Top 10 Marathi news at 7 pm : Review of important news of the day 2021-06-22