हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तराखंडसह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार (Coronavirus) झपाट्यानं वाढताना दिसत आहे. मात्र, हरिद्वार येथील उत्तराखंड कुंभमेळा भरवल्याने धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. (Haridwar Mahakumbh)फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क (Mask) आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल होत आहेत. इथे झालेल्या प्रचंड गर्दीदरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारही अपयशी ठरलं आहे.
यामुळे स्वाभाविकपणे जे होणार होते ते आता समोर येवू लागले आहे.कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्ण संख्या तब्बल 1800 टक्क्यांनी वाढली असल्याचे समोर आले आहे.अनेक साधू संत करोना बाधित झाले आहेत.अशातच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचेही कोरोनाने निधन देहराडूनमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.
आता रुग्ण संख्येचा विस्फोट करणारी धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.देशात कोरोना ने हाहाकार माजवलेला असतानाही बेजबाबदारपणे वागत लाखोंच्या संख्येने कुंभ मेळ्याची गर्दी जमवत हे मेळावे आयोजित करण्यात आले होते.त्यावर देशभरातील नागरिकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केल्याने शेवटी नरेंद्र मोदी यांनी पुढील कुंभ मेळे प्रतीकात्मक पद्धतीने साजरे करावेत असे आवाहन केले.मात्र हे नंतरचे आवाहन रुग्ण संख्येचा विस्फोट थांबवू शकले नाही.
कुंभमेळा साठी एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. त्यासोबतच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात देखील प्रचंड वाढ झाली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या एकूण करोना मृत्यूंपैकी जवळपास निम्मे मृत्यू हे कुंभमेळ्यानंतर झालेले आहेत! त्यामुळे कुंभमेळ्यामुळेच उत्तराखंडमध्ये करोनाचं प्रमाण वाढलं का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कुंभमेळ्याच्या काळात मोठी रुग्णवाढ!
१ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्यमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. हे प्रमाण देखील उत्तराखंडच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मे आहे. त्यासोबतच उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मे या दरम्यान झालेले आहेत. १ मे ते ७ मे या आठवड्याभरातच उत्तराखंडमध्ये तब्बल ८०६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. क्विंटने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधल्या रुग्णसंख्येत तब्बल १८०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
स्वत: कोरोनातून बरे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी उधळली होती मुक्ताफळे
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे करोनामधून बरे झाल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावू लागले.
त्यांनी या कुंभ कुंभमेळ्यात देखील हजेरी लावली होती.
कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर गर्दीवर देश भरातून टीका झाल्यावर माध्यमांशी बोलताना
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुक्ताफळे उधळली होती.
“महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात.
मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि १२ वर्षातून एकदाच होतो.हरिद्वार,बनारस आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो.
त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे,” असं मत रावत यांनी व्यक्त केलं होतं.
यामुळे धर्माच्या नावाखाली लोकांना भावनिक करून गर्दी जमवत कोरोनाचा प्रसार वाढवल्याने
अनेक निष्पाप लोकांचे जीव हकनाक गेले आहेत हे खेदजनक
आणि कधीही भरून न येणारं दु:ख आता राजकारणी लोकांच्या बेजबाबदारपणामुळे
मृतांच्या मागे उरलेल्या नातेवाईकांना भोगावे लागत आहे.
सामान्य लोकानाही जात-धर्म आणि त्याच्या अनुषंगाने होणारे राजकारण यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
आपला अमूल्य जीव धोक्यात घालून आपण नेमकं काय साध्य करतोय?
आपल्या मागे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे काय?
असे प्रश्न आणि त्याची उत्तरे सामान्य नागरिकांनी शोधली पाहिजेत. त्यावर विचार केला पाहिजे.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 10 , 2021 12: 22 PM
WebTitle – Number of corona positive patients explodes in Uttarakhand after Kumbh Mela 2021-05-10