हेल्पिंग हँड फॉर ब्लड- सकाळी सकाळी कॉरंटाईन सेंटर मधून फोन आला होता, “राहुल साब मैं आपको जानता हूँ. मिले है हम. मुझे हॉस्पिटल में ऍडमिट होना है. डॉक्टर ने बोला है. कुछ किजीए आप. मेरा यहां कोई नहीं है. टॅक्सी चलाता था.मैं – मेरी बिवी और छोटी बच्ची हम तीन लोग ही रेहते है बंबई में” त्याच्या आवाजात भिती – काळजी – आशा – खात्री असं खूप काही होते. मुंबईच्या एका झोपडपट्टीत होता राहायला तो – त्याची बायको आणि छोटी मुलगी.
ज्यावेळी त्याचा फोन आला तेव्हा मुंबईतील परिस्थिती वाईट होती. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हते. सगळं सैरवैर झाले होते. “कोई नहीं यहा तेरा कैसे? हम लोग है ना. करता हूँ कुछ” म्हणत, त्याला त्याच्या घराचा पूर्ण पत्ता आणि बायकोचा मोबाईल नंबर पाठव म्हणून सांगितले.
आता बेड शोधायला सुरुवात झाली होती. मुंबईत एक बेडही मिळणे खूप अवघड झाले होते.
BMC war room – Helpline सगळीकडे फोनाफोनी सुरू झाली. पण हाती काहीच लागत नव्हते.
मग प्रत्येक हॉस्पिटलला फोन करायला सुरुवात केली. आणि जवळपास ५० फोन केल्या नंतर कळले की एका हॉस्पिटलमध्ये एक बेड आहे.
चुकीचे असेल हे त्यावेळी खरतर पण एका राजकीय मित्राला फोन केला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगायला सांगितले.
मित्राने कन्फर्म त्याच्या नावाने बुक केला आणि एक तासात पेशंट येईल म्हणून कळवले हॉस्पिटल मध्ये.
लगेच याला कॉरंटाईन सेंटर मध्ये फोन केला की, तयारी करायला घे. बेड बुक केला आहे.
पण डिस्चार्ज मिळे पर्यंत वेळ जाईल असे तो म्हणाला. तिथल्या नोडल ऑफिसचा नंबर शोधला.
त्यांना फोन करून कळवले. त्यांनी लगेचच प्रोसिजर करायला सांगितली.कॉरंटाईन सेंटर मध्ये त्याच्या शिफ्टिंगची प्रोसेस सुरू होती.
हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर रिक्षाचे बिल झाले होते ४१७ रुपये
इकडे त्याच्या बायकोचा नंबर एका मित्राला पाठवला आणि त्याला सगळं सांगितले. अर्ध्या तासात कॉरंटाईन सेंटर मधून फोन आला की, झाली आहे प्रोसेस सगळी. त्याला म्हणालो रिक्षा पकड आणि या हॉस्पिटलला पोहच. अंबुलन्सला फोन करून ही कनेक्ट होईना. त्याला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी एक तास लागला. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर रिक्षाचे बिल झाले होते ४१७ रुपये. पुन्हा फोन आला, “राहुल साब ४०० रुपया हूँ हा है रिक्षा का लेकिन मेरे पास २०० रुपये ही है.” त्याला म्हणालो रिक्षा वाल्याला फोन दे, “दादा ! बाहेरून आला आहे तो. तुमच्या सारखीच टॅक्सी चालवत होता. तुमचा नंबर सांगा मला. २०० रुपये घ्या त्याच्याकडून. उरलेले मी रात्री पर्यंत पोहचवतो तुमच्या पर्यंत.” बाहेर परिस्थिती इतकी वाईट होती की लोक जाणत होते.
एकतर याच्या सोबत कोणीच नाही. लवकरात लवकर याने ऍडमिट व्हायला हवं हे कळत होते. त्याला म्हंटले ही, “फटाफट कर सब”. पुन्हा राजकीय मित्राला फोन लावला. तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलला. आणि मेरा यहा कोई नहीं म्हणणारा तीन तासात ऑक्सिजन बेड वर ऍडमिट झाला.
इकडे मित्राला फोन केला. त्याच्या बायकोला फोन करून भेट सांगितले. दोन तीन तासा नंतर मित्र तिला मुंबई उपनगरच्या एका झोपडपट्टी बाहेर भेटला. सोबत एक महिन्याचा किराणा होत्या त्याच्या. तिच्या हाती सोपवला आणि “आपके पती ने देने बोला है” म्हणून सांगितले. मित्राला पुन्हा फोन केला. तिला ५०० रुपये दे म्हणालो. लहान मुलीच्या दुधाला उपयोगी पडतील तिला. मित्र देऊन निघाला तिथून.
तुमचा फोन आला. मिळाले मला माझे २०० रुपये
आता रिक्षावाल्याला फोन केला, “दादा ! कुठे आहात तुम्ही? सकाळी आपले बोलणे झाले होते.२०० रुपये द्यायचे होते तुम्हाला”. समोरून आवाज आला, “तुमचा फोन आला.मिळाले मला माझे २०० रुपये. देवाने पुण्याचे काम करून घेतले आज माझ्याकडून”. माझ्यातर अंगावर काटा आला हे ऐकून. परिस्थितीत पैसा मोठा असतो की माणुसकी?. तर साला माणुसकी मोठी असते. रिक्षा वाल्याचे आभार मानले आणि फोन कट केला.
त्याला ऍडमिट केले. त्याच्या घरी किरण्याचे सामान पाठवले. मुलीच्या ५०० रुपये दिले म्हणजे आता त्याची असलेली अडचण दूर झाली होती.दोन दिवसाने पुन्हा फोन आला त्याचा आणि रडायला लागला, “आपने बहुत किया मेरे लिए. घर पर सामान भेजा – पैसा दिया”. मी, “इतना कुछ नहीं. ठीक हो जा. फिर दे देना मेरा सामान मुझे”. हसला ऐकून. विचारले त्याला कुठे भेटला होता तू मला आधी? तर म्हणाला, “आपने एक लडकी को व्हीलचेअर दिया था. उस लडकी के पिता के साथ मे आपके घर आया था. तब आपसे नंबर लिया था आपका. आज काम आ गया. ठीक होकर बच्ची और बिवी को लेकर आउंगा.”
कदाचित त्याला सोडले ही असेल घरी.मला भेटण्यासाठी तरी लवकर बरे व्हावे त्याने.पुन्हा नव्या जोमाने टॅक्सी चालवावी.
छोट्या असलेल्या त्याच्या मुलीला खूप शिकवावे. शेवटी असते तरी काय
“गम छोटा उम्मीद बडी
बितेगी हर मुश्किल की घडी”
लेखन- राहुल साळवे
कवी,गीतकार सामाजिक कार्यकर्ता
हेल्पिंग हँड फॉर ब्लड – संस्था
राहुल अशा स्टोऱ्या फेसबुकवर टाकून लोकाना केवळ दिलासा देत नाही तर आपला नंबर शेअर करून मदत घेण्याचे आणि देण्याचे देखील आवाहन करत असतो.आमची प्रत्येक नागरिकास विनंती आहे.तुम्हाला या काळात जे जे शक्य आहे करा.मागे पुढे पाहू नका,माणूसकी जगली तरच माणसे जगतील.या कठीण काळात आपणच एकमेकांसाठी उभे राहणार आहोत.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on MAY 06, 2021 12: 00 PM
WebTitle – in-the-corona-pandemic-situation-only-humanity-fights-against-corona-2021-05-06