सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती होतांना या कार्याला जशी मित्रांची कमतरता नव्हती तसाच विरोधकांची ही उणीव नव्हतीच.
२६ मार्च १९४६ रोजी नवी दिल्ली, मध्यवर्ती विधीमंडळात सिद्धार्थ महाविद्यालयाला अनुदान देण्याबाबत जी चर्चा झाली त्यावर नजर फिरवली तरीही काही लोकांचा पोटशूळ दिसून येईल.
या द्वेषाची कावीळ २६-३-१९४६ रोजी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुत्राच्या रुपाने दिसली. पंडित गोविंद मालवीय यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संदर्भात अगदी कुत्सितपणे प्रश्न विचारला आणि स्वतः सांगितले की, अस्पृश्यांच्या शैक्षणिक गरजा हिंदू समाज पुरवीत आहेत त्यामुळे त्यांना काॅलेजची काही गरज नाही. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मालवीय याला जे उत्तर दिलं ते अप्रतिम आहे.
नंतर बोलतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक खुलासा केला की, हे महाविद्यालय फक्त अस्पृशांचे आहे असं म्हणणं सर्वस्वी चुकीचे आहे. इतर सर्वांना या काॅलेजमध्ये यायची पूर्ण मुभा आहे. काॅलेजमध्ये अध्यापक वर्गांची जी निवड करण्यात आली त्यात हिंदू ब्राह्मण, ब्राह्मणेतर, पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम धर्मातील सर्वांना घेतलं आहे. मुंबई विद्यापीठांशी संलग्न होतानाच त्यांनी कोणतीही शंका न करता लगेच मान्यता दिली.
एवढं करुनही कुजबूज मोहीम काही थांबली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय नेते असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात त्यांच्याच विचारप्रणालीचे शिक्षण दिल्या जाईल. पण हा सुद्धा आरोप निराधार होता. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयाच्या संदर्भात सर्वाधिकार हे प्राचार्य यांच्यावर सोपवण्यात आले होते. उलट त्यांचा कटाक्ष असे की, विद्यार्थ्यांना सर्व राजकीय नेत्यांची भाषणं ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
या महाविद्यालयात फक्त अस्पृश्य मुलांनाच प्रवेश देण्यात येतो हा ही एक खोडसाळ प्रचार.
एवढी तारेवरची कसरत करत करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयासाठी विद्यामान सरकार कडून तीन लाख रुपये देगणी आणि तीन लाख बिगर व्याजी रक्कम कर्ज म्हणून घेतली. हैदराबादच्या निजामाने पाच लाख रुपयांची देणगी दिली. कोल्हापूर संस्थानाने पाच हजार रुपये देणगी दिली इतरही लहान-मोठ्या सर्व मिळून ऐंशी हजार पर्यंत देणगी जमा झाली.
आज जी महाविद्यालयाची इमारत बघत आहोत त्या पूर्वी जपान सरकारच्या बॅंक होत्या.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानी भारतातून निघून गेले.
कारण भारतात ब्रिटिश राजवटीत आपलं काही खरं नाही असे त्यांचे मत होते.
तेव्हा या इमारती (आजचं आनंद भवन) गव्हर्नर कडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नावाने सिद्धार्थ महाविद्यालयासाठी देण्यात आल्या.
______________________________________________
१) सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ राधाकुमुद मुखर्जी यांच्या हस्ते इतिहास मंडळाचे उद्घाटन २१ जुलै १९५५ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी मुखर्जी हे भाषण करत आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे श्रोत्यांमध्ये बसले आहेत.
२) हिंदू कोड बिल या विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालयांत भाषण केले होते.
३) पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ महाविद्यालय, आनंद भवन, फोर्ट, मुंबई येथे आपल्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर.
४) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्पेशल कमिटी फॉर प्रिलिमिनरी आॅर्गनायझेशन वर्कच्या सदस्यांसह डॉ बाबासाहेब आंबेडकर.
लेखन – Subhash Wankhade
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. सिद्धार्थ महाविद्यालय – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
all images provided by Subhash Wankhade source Facebook
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 08, 2021 11: 01 AM
WebTitle – siddharth-college-dr-babasaheb-ambedkars-dream-2-2021-04-08