स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदेमंडळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या लोकसभेत हिंदू कोड बिलाविषयी अनेकदा चर्चा झाल्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या बिलाविषयी बोलले होते की हिंदू कोड बिल हे नामंजूर झाले तर मंत्रिमंडळ राजीनामा देईल,पण सनातनी हिंदूंच्या मतदान पुढे दबावाखाली जवाहरलाल नेहरू यांनी सपशेल शरणागती पत्करली. दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मेहनत करून हिंदू कोड बिल तयार केले होते पण तत्कालीन काँग्रेसने सनातनी हिंदूंच्या दबावाखाली येऊन हिंदू कोड बिलाला अडगळीत टाकण्याचे काम केले.
हे पाहून बाबासाहेबांना अतिशय वाईट वाटले त्यांनी ज्या प्रकारचे बिल तयार केले होते तसेच बिल संसदेत मंजूर झाले पाहिजे असे बाबासाहेबांचे मत होते. याबाबत मिस्टर मिचेनेर यांना आपली भूमिका सांगीतली होती. बाबासाहेब म्हणाले होते की, “घटनेत सामाजिक समता संपूर्णपणे आणता आली नाही ही कमतरता दूर करण्यासाठी हिंदू कोड बिल तयार केले होते.”
मंत्रीपदाचा राजीनामा
हिंदू कोड बिल जसेच्या तसे लागू न होण्याची चिन्हे बाबासाहेबांना दिसू लागली होती. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जसे तयार केले होते तसेच ते लागू करावे अशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी घेतली होती.आणि तसे बील जर पास नाही झाले तर आपण मंत्री म्हणून काम करणार नाही आणि मंत्रीपदाचा राजीनामा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती.
हिंदू कोड बिल हे जसे आहे तसे पास होत नाही हे बाबासाहेबांना समजुन चुकले होते. मंत्री पदाचा राजीनामा देण्याचे ठरवल्यानंतर बाबासाहेबांनी जवाहरलाल नेहरू यांना 10 ऑगस्ट 1951 ला सविस्तर पत्र लिहिले होते त्यात बाबासाहेब म्हणत म्हणाले होते की,” 16 ऑगस्ट 1951 ला हिंदू कोड बिल संसदेत यावे आणि 1 सप्टेंबर पासून मंजूर व्हावे अशी माझी इच्छा आहे माझी प्रकृती फार बिघडली आहे अतिश्रम न करण्याचा मला वैद्यकीय सल्ला दिला आहे तरीपण मी हिंदू कोड बिलाला महत्व देतो विरोधकांची समजूत काढून हिंदू कोड बिल मंजूर करावे अशी माझी तीव्र इच्छा आहे”
त्याच दिवशी म्हणजे दहा ऑगस्ट 1951 रोजी पंडित नेहरूंनी याबाबत उत्तर देताना सांगितले की
हिंदू कोड बिलाला बऱ्याच लोकांचा विरोध असल्यामुळे हे बिल सप्टेंबरमध्ये आणावे
तोपर्यंत लोकांच्या मनस्थितीत फरक पडेल असे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ठरले आहे आणि ते योग्य आहे त्याबद्दल तुम्ही घाई करू नये.
राजीनामा
27 सप्टेंबर 1951 ला बाबासाहेबांनी नेहरूंना पत्र पाठवून कायदेमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. तो राजीनामा ताबडतोब स्विकारा अशी विनंती केली. “हिंदू कोड बिल पास झाल्यानंतर प्रकृती अस्वस्थ आहे यासाठी राजीनामा देणार होतो पण आता हे बिल लवकर पास होणार नाही असे वाटत असल्यामुळे मी राजीनामा देतो आहे “असे बाबासाहेबांनी सांगितले.
27 सप्टेंबरला नेहरूंनी बाबासाहेबांना पत्र पाठवून कळवले की ,”तुम्ही बील लवकर पास होत नाही म्हणून नाराज झाला ते योग्यच आहे,पण आणखी थोडा धीर धरला असता तर बरे झाले असते. मंत्रिमंडळात असताना तुम्ही जे कार्य केले आहे ते अत्यंत चांगले आहे. तुमचा राजीनामा माझ्याकडे येण्याअगोदर वर्तमानपत्रातून तुम्ही राजीनामा देणार आहात अशा पद्धतीच्या बातम्या मी वाचल्या होत्या आणि मला आश्चर्य वाटले होते “असेही नेहरू बोलले होते.
एक ऑक्टोबरला बाबासाहेबांनी नेहरू ला पत्र लिहून कळवले की सहा ऑक्टोबर पर्यंत माझा राजीनामा तहकूब समजावा
त्या दिवशी मी लोकसभेत माझ्या राजीनाम्याबाबत संसदेत निवेदन देईन
त्यानंतर तुम्ही राजीनामा स्वीकारा पंडित नेहरूंनी चार ऑक्टोबरला बाबासाहेबांना पत्र पाठवले आणि त्यांची ही विनंती मान्य केली.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
4 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
5 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
6 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 7
First Published on APRIL 07, 2021 13 : 10 AM
WebTitle –hindu-code-bill-dr-b-r-ambedkar-2021-04-07