“त्या” हॉल मध्ये एक मिटिंग सुरु होती
गरिबांना कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या , स्मॉल फायनान्स बँक, गोल्ड लोन कंपन्या यांच्या प्रतिनिधींची ; आम्ही गरिबांना कर्जे देऊन दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम राबवित आहोत असे ते सांगत होते.
मी प्रश्न केला कि तुमच्या १० रुपये दर्शनी मूल्यांच्या शेअर्सचे भाव ५०० रुपये इतके वाढलेले कसे ?
ते म्हणाले कि म्हणजे आम्ही नफाच कमवायचा नाही काय?
मी म्हणालो तुम्ही नफा कमावू नये असे आम्ही म्हणत नाही ; पण दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमांतुन मिळणारा नफा आणि शीतपेये विकून मिळणारा नफा यात काही तरी फरक असावा कि नसावा ?
तर त्यांनी मला त्या हॉलमधूनच बाहेर काढले
______________________
“त्या” हॉलमध्ये एक मिटिंग सुरु होती
बाल कामगार नकोत यासाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींची
मी प्रश्न केला कि सरकारी कायदे असून देखील तुम्हाला का काम करावे लागते आहे
ते म्हणाले म्हणजे आम्ही काम करतो ते काय चूक आहे का ?
मी म्हणालो तुम्ही चांगलेच काम करत आहात पण तुम्ही कोट्यवधी कष्टकऱ्यांना, जे तुम्ही ज्या बाल कामगारांसाठी काम करता त्यांचे आई वडील आहेत , त्यांचे किमान वेतन घसघशीत वाढावे , ते त्यांना नियमित मिळावे यासाठी ब्र देखील काढत नाही
बऱ्यापैकी मासिक वेतन मिळाले तर कोणती आई आपल्या लहान मुलाला पैसे कमवायला पाठवेल ?
तर त्यांनी मला त्या हॉलमधूनच बाहेर काढले
_____________________
“त्या” हॉलमध्ये एक मिटिंग सुरु होती
पर्यावरणाला हानी पोचवन्याची क्षमता असणाऱ्या रसायने , कागद, खाणी अशा उद्योगांच्या प्रितिनिधींची
मी प्रश्न केला कि तुमच्या उद्योगांमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे
ते म्हणाले जीडीपी वाढवायची , आपल्याला सुखसोयी हव्यात तर माणसाला पर्यावरणाची हानी सोसायलाच लागेल
मी म्हणालो पर्यावरणाची हानी झाली पाहिजे कि नाही हा प्रश्न नाही तर किती प्रमाणात हानी समर्थनीय आहे हा आहे; अधिक भांडवली आणि रोजचा खर्च करून कमी हानी करणे शक्य आहे , पण त्यातून तुमच्या प्रॉफिट मार्जिन्स कमी होतात ;
आणि आपली पिढी काही शेवटची पिढी नाहीये ना ? आपल्या मागून येणाऱ्या , न जन्मलेल्या शेकडो पिढयांना पण तुम्ही म्हणता त्या सुखसोयी लागणार आहेत ना ? मग त्यांना कोणते पर्यावरण तुम्ही मागे ठवून जाणार आहात ?
तर त्यांनी मला त्या हॉलमधूनच बाहेर काढले
___________________
यातून मी एकच धडा घेतला ; कि फक्त हॉल च्या नेहमी बाहेर असणाऱ्या,जगणाऱ्या ,
हॉलमध्ये प्रवेश नसणाऱ्या लोकांमध्येच राहायचे ; त्यांनाच सारे समजवून द्यायचे
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 30 , 2021 20 : 35 PM
WebTitle – Questions from marginalized community people who outside the hall 2021-03-30