औरंगाबाद – औरंगाबाद मध्ये महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये ड्यूटीवर असणाऱ्या एका डॉक्टरने महिला रूग्णाकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.या प्रकराने संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयात शिरून सदर डॉक्टरला बेदम मारहाण केली.शरीर सुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आल्याचे महानगरपालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी स्पष्ट केले.
महिला रूग्णाकडे शरीरसुखाची मागणी
पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली,या महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन सदर आयुष्य डॉक्टर तिला सतत फोन करून त्रास देत होता. मंगळवारी मध्यरात्री डॉक्टरने या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.तिला जबरदस्ती गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला असता महिलेने आरडा ओरडा सुरू केला. यामुळे कोविड केअर सेंटर मध्ये एकच गोंधळ उडाला,उपस्थित कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्या महिलेला सोडवले. पीडित महिला या प्रकारे घाबरून रडू लागली.
या घटनेची माहिती महिलेने नातेवाईकांना कळवताच तिचे नातेवाईक रुग्णालयात शिरले
आणि या डॉक्टरला बेदम मारहाण केली.दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यप्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना हा प्रकार समजला.
त्यांनी तातडीने चौकशी करून गुरुवारपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून
या स्त्रीलंपट डॉक्टरची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली असल्याचे समजते.
मात्र,महिलेने किंवा कुटुंबीयांनी या बाबत पोलिसांत तक्रार न दिल्याने आरोपी डॉक्टरवर कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही.
मात्र त्याची सेवेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे महानगरपालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी स्पष्ट केले.
याप्रकाराने कोविड सेंटर मधील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरवणीवर आला आहे.
- टीम जागल्या भारत
कामाच्या ठिकाणी तरुण मुलीचा शारीरिक छळ;अधिकारी निलंबित
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 04 , 2021 13 :00 pm
WebTitle – Doctor dismissed for sexual harassments with corona positive women in aurangabad