गेले सहा महीने शेतकरी अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.लोकशाहीत जनता मोठी आहे.महत्वाची आहे. इतर गोष्टी दुय्यम असतील,हे वेळोवेळी समोर आले आहे.आपल्या लोकशाहीचे वर्णन “‘लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही” (लोकांनी निवडून दिलेलं सरकार अनुस्यूत) लोकशाहीत मालक जनता हे मेंदूत घोटून फिट्ट केले पाहिजे. कधी कधी डोळे सुद्धा असे धोका खातात,फसतात,म्हणजे दिसतं ते सत्य परंतु अर्धवट सत्य, “नरो वा कुंजरो वा”
पांढऱ्या खादीतील हा जनतेचा नेता निवडून आल्यावर ‘साहेब’ होतो.आणि मग मनमानी करायला लागतो.
लोक हे विसरले,अन नेत्यांपूढे मुजरे करायला लागले.गोरा साहेब गेला पण आताचा काळा साहेब गोऱ्याच्या वर तोरा करतो अशी आपली परिस्थिती.त्यामुळे “साहेब”म्हणलं की आपण काहीतरी बादशाह टाइप व्यक्तिमत्व असल्याचा भास साहेबांना होतोच होतो.त्यामुळे समस्त आलम जनता ही आपली गरीब बुजरी गुजरी प्रजा असल्याचे नेत्यास वाटू लागते.पांढऱ्या खादीतील हा जनतेचा नेता निवडून आल्यावर ‘साहेब’ होतो. आणि मग मनमानी करायला लागतो.
मतदानाला जनतेच्या पायाशी लोळण घेणारा नेत्याला मग जनतेची बात ऐकू यायचे कमी होते अन रटाळवाणी ‘मन की बात’ लादणे सुरू होते.मी आता सत्ताधीश आहे.भाग्यविधाता आहे.अशा आविर्भावात नेता चालू बोलू लागतो.काही तर एवढे सोंग करतात की पेपरात ते छापून येतच असतं.असो.तर असा नेता जर विशिष्ट विचारसरणी राबवत असेल तर देशभरात तिचे पडसाद उमटत राहतात.
वृद्ध दु:खी कष्टी मेहनती लोक थंडीत गारठून मेले जगले त्याची फिकीर नेत्याला नसते
यातच उद्योगपती मित्र असतील तर नेत्याला थेट भ्रष्टाचार करण्याची आणि स्वत:चं घर भरण्याची गरज पडत नाही.तसे घर भरणारे पत्नी मुलं बाळगून असतात म्हणे,आणि सगळी संपत्ती सुद्धा मग सर्व मुला बाळांच्या पत्नीच्या नावे गुपचुप केली जाते.तर कधी इतर नातेवाईक कुणाला बायका मुलं नसतील तर असली दौलतज्यादा मित्रांवरच करण्याची वेळ येते.हे सुद्धा एक दुर्दैवच म्हणावे लागेल.तसा मित्रांना लाभ पोहोचवणे हा देखील भ्रष्टाचारच हो पण काम करतोय ना,व्यवसाय करतो उद्योगपती आहे.मग हे सगळं त्याखाली झाकून जातं.बोलायला जागा शोधावी लागते,अलीकडे ही नवीन क्लूप्ति शोधली गेलीय.
आता मित्रांना फायदा करायचा म्हणजे काहींना रस्त्यावर आणावे लागेल हे ओघाने आलेच मग शेतकरी आले काय अन मध्यमवर्गीय आले काय.फरक पडत नाही.अमर्याद ताकदीच्या कैफात बुडालेला मदमस्त वळू जसा गावाला वात आणतो तसे काही नेतेही सत्तेच्या कैफात देशाला वात आणू शकतात.मग वृद्ध दु:खी कष्टी मेहनती लोक थंडीत गारठून मेले जगले त्याची फिकीर नेत्याला नसते.
थाप मारली गेली
यासगळ्यावर त्याच्याकडे उत्तरे द्यायला यंत्रणा असते,व्यवस्था असते.आणि विशेष तुकडी असते भक्त नावाच्या अर्धवट रेम्याडोक्या बाजारबुणग्यांची यांच्या मेंदूंचे प्रोग्रामिंग आयटीसेल मध्ये व्यवस्थित झालेलं असतं इथं एकदा मेंदू धुतला की त्यावर कितीही अभ्यासू तत्वज्ञानी दोरखंडाचा घसरा एकवेळ दगडावर उमेटल पण यांच्या मेंदूवर उमटला तरी तो पूर्ववत आपल्या गुळगुळीत अवस्थेत येतो.
त्यांना सांगितलं गेलं की लाल किल्यावरचा राष्ट्रध्वज तिरंगा उतरवून खलिस्तान चा झेंडा फडकवला.ही थाप मारली गेली.प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.लोकानी ते निदर्शनास आणून दिलं.
बघणाऱ्यास वाटावे जे दाखवलं जात आहे तेच सत्य आहे.
मग,हा अजेंडा घेऊन काहीकाळ बदनामी झाली,सफाई समोर आल्यावर नवा अजेंडा आणला,तिरंगा ध्वजापेक्षा उंच झेंडा फडकवला गेला. (did Delhi farmer protesters hosted the Khalistan flag on red fort fact check)
नेपथ्य अगोदरच ठरलेलं,कलाकार अगोदरच ठरलेले.फोटो कोणत्या एंगल मधून घ्यायचे ठरलेलं,सगळा गेम प्लान फिट होता.तसे झाले. ज्याना काम दिलेलं त्या कलाकारांनी झेंडा फडकावला,ज्याना फोटो वायरल करण्याचे काम दिलेलं त्यांनी ते केलं.व्यवस्थित एंगल साधला गेला.तसे करताना राष्ट्रध्वज फ्रेम मध्ये येणार नाही याची काळजी घेतली गेली.बघणाऱ्यास वाटावे जे दाखवलं जात आहे तेच सत्य आहे.
नरो वा कुंजरो वा
कधी कधी डोळे सुद्धा असे धोका खातात,फसतात,म्हणजे दिसतं ते सत्य परंतु अर्धवट सत्य, “नरो वा कुंजरो वा” अश्वत्स्थामा मेला पण तो हत्ती होता की मनुष्य माहीत नाही.कधीही असत्य न बोलणारा युधिष्ठिर असं ज्याला महाभारतात मानलं गेलं तोही असत्य बोलला सोईचं अन द्रोणाचार्याचा जीव घेतला गेला.आपल्याकडे हे फारच प्रचलित.नरो वा कुंजरो वा म्हणजे अश्वत्स्थामा मेलेला नाही.जीवंत आहे.मेला तो हत्ती.पण लबाडी झाली.कोण मेला माहीत नाही.हत्ती की खरा अश्वत्स्थामा, तसा इथे फोटो खरा पण ते अर्धसत्य.राष्ट्रध्वज नेपथ्यात नाही,गेम इथेच आहे.आयटीसेल कामाला लागला.खलिस्तानवाद्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला हा गेम ठरलेला होता.
नंतर सत्य समजल्यावर मात्र सगळा गेम उलटा फिरला पण तोपर्यंत उशीर झाला होता,हा उशीर नेहमीप्रमाणे होतो.मग या गेमनंतर अजेंडे झेंड्यावरून रणकंदन,लाल किले की प्राचीर से झंडा फहराया गया.लाल किल्ला नेपथ्यात आला,असे सगळे ईलीमेंट्स एका मागोमाग एक उभे केले जातात.
आता मुद्दलात निशान साहिब किंवा निशान साहेब हा शीखांचा पवित्र त्रिकोणी धार्मिक ध्वज आहे.
आता धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकाना इतर धर्माचे वावडे असणे द्वेष असणे ओघाने आलेच,त्यांचे नेते चक्क तोच ध्वज डोक्याला बांधून जनतेची मने आकर्षित करताना दिसतात.
लाल किल्यात एक मस्जिद सुद्धा आहे.
आता प्रश्न असा आहे.शिखांचा पवित्र धार्मिक ध्वज हा एवढा द्वेषाला कारणीभूत का ठरत आहे? एवढा तिरस्कार का केला जात आहे? लाल किल्ला कशाचे प्रतीक आहे? थोडं लाल किल्ल्याबाबत
लाल किल्ला बांधला मुघल बादशाह शाहजहांने म्हणजे बादशाह मुस्लिम आहे.या किल्ल्याच्या दृष्टीने देशासाठी काय महत्व आहे? तर 15 ऑगस्ट या दिवशी काचेच्या पेटीतून भाषण देणे एवढंच महत्व आहे.त्याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.ना की हिंदू धार्मिक स्थळ ना की राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रीय किल्ला म्हणून.मग अपमान कशाचा आहे? पर्यटन स्थळाचा ? झेंडा कुठे आहे हे वर स्पष्ट झालंच नरो व कुंजरोवा.
आणखी एक गंमत आहे.लाल किल्यात एक मस्जिद सुद्धा आहे.जीला मोती मस्जिद म्हणून ओळखले जाते.
शीख धर्माला चलाखीने हिंदू धर्माचाच एक पंथ आहे बरं..असं ठोकून दिलं जातं.
बाबरची मस्जिद सहन न होणारे मुस्लिमांना पदोपदी डोळ्यावर धरणारे अचानक मुस्लिम बादशाह आणि आतल्या मस्जिद साठी आंकडतांडव करतात यावर कुणालाही विश्वास बसणे शक्यच नाही.परंतु गेम तसा सेट केला होता म्हणून हा गेम खेळला गेला.
निशाणसाहिब फडकावणारा दीप सिद्धू हा पंजाबी कलाकार भाजपच्या जवळचा.मोदी शाह सन्नी देओल सोबत त्याचे फोटो.लोकसभेच्या गुरुदासपूर मतदार संघात सनी देवलच्या प्रचाराची धुरा त्यानेच सांभाळली होती.आता सन्नी पाजी म्हणतो आमचा संबंध नाही.निवडून आल्यानंतर ढाई किलो का संबंध संपला असावा.
इथं आणखी एक मुद्दा उपस्थित होतो. शीख धर्माला चलाखीने हिंदू धर्माचाच एक पंथ आहे बरं..असं ठोकून दिलं जातं. सगळीकडे आपली सोय लावायची सगळं आमचंच सगळीकडे मी मी आणि मीच.इतरांना अस्तित्वच नाही.आणि मग हिंदू धर्माच्या या तथाकथित पंथाच्या पवित्र ध्वजाने मुस्लिम शासकाने बांधलेला किल्ला कशाला अपवित्र होत आहे?
संसदेचे निर्माण होत असताना हिंदू पध्दतीने पूजाअर्चा कर्मकांड का करण्यात आले?
त्याबद्दल एवढा आकांड तांडव का केला गेला? एवढा धुडगूस का घातला गेला? याचं उत्तर कुणाकडे कशाला असेल?
तो काही गेमचा भाग नाही.आणि मग मुद्दा येतो खऱ्या वस्तुस्थितीचा.
लाल किल्ला हा एक पर्यटन स्थळ आहे.तो भाड्याने चालवायला दिला.
तेव्हाही अशी मल्लिनाथी केली गेली.त्यात काही मुस्लिम शासकाचा आहे असेही म्हणताना दिसलेले.
म्हणून त्याची किंमत नाही.हा त्यातला मुद्दा.
हा तर वस्तुस्थिती अशी की देशाची मग महत्वाची कोणती इमारत असेल तर ती आहे संसद जिथे ‘लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले नेते बसून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करणार.हे लोक कोण? त्याची व्याख्या काय करणार? ते सर्वधर्मीय असणार.
म्हणजे इथं आणखी एक गोष्ट अशी की संसदेत विरोधक सुद्धा असणार बरं का.
फक्त सत्ताधारिच एकाच बाजूने राज्य हाकणार नाहीत.
मनमानी निर्णय घेणार नाहीत.तर यात हजारो जातींचे शेकडो धर्माचे लोक असणार आहेत.
फक्त हिंदू धर्मीय नसणार.हे वास्तव.मग संसदेचे निर्माण होत असताना हिंदू पध्दतीने पूजाअर्चा कर्मकांड का करण्यात आले?
एक धर्माचा झेंडा इथे नसला पाहिजे
निशान साहिब बद्दल जाणून झालेलं आहे.तो शीख धर्मियांचे धार्मिक प्रतीक तरीही तुम्हाला मान्य नाही.
राष्ट्रध्वजाचा अपमान झालेला नाही.लाल किल्ला अपमान होण्याचे काही कारण नाही,सगळे मुद्दे निरस्त झालेले आहेत.
उरला मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा.तुम्ही जर असे ऑर्ग्युमेंट करणार असाल की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.
त्यामुळे कोणत्याही एक धर्माचा झेंडा इथे नसला पाहिजे ही गोष्ट मान्य केली जाऊ शकते,
पण तेव्हाच जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवीन संसद भवनच्या भूमीपूजनाला आक्षेप घेतला असता.
याचा अर्थ तुमच्या मुद्दलात खोट आहे.
खरी विटंबना खरा अपमान हा की इतर धर्मांना डावलून आपल्याच धर्माला कायम प्रधान्यक्रम देणे.
विचारी विवेकी लोक याच विरोधात भूमिका घेत असतात की सर्वांना समान पातळीवर पाहिले पाहिजे.
सर्वांशी सौजन्य आणि सौहार्दतेने वागले पाहिजे.
परंतु देशाने हा विवेक 2014 साली गमावला असे दिसते,तसा तो यापूर्वीही गमावलाच ती चूक कुणी सुधारली नाही.
इथल्या लोकशाहीसाठी हजारो जाती शेकडो धर्म आणि पंथ यासाठी धोक्याची घंटा असेल.
जेष्ठ कवि यशवंत मनोहर यांच्या भूमिकेची आठवण याठिकाणी म्हणून येते.नुकताच त्यांच्या भूमिकेवरून विनाकारण वादंग माजवला गेला.त्यांनी हेच म्हटले की इतर धर्माची प्रतीके तुम्हाला चालणार आहेत का मग? काल तर त्यावरून देश पेटवण्याचा प्रयत्न झाला हे आपण अनुभवलेच.कोणत्याही विशिष्ट धर्माला त्याच्या प्रतिमा प्रतीकांना वेटेज देणे टाळले पाहिजे.ते याचसाठी,अन्यथा फक्त एकाच धर्माची प्रतिमा प्रतीके सगळीकडे नाचवत देशाला पाकिस्तानच्या धर्तीवर धर्माच्या आधारावर राष्ट्र होणार असेल तर ते इथल्या लोकशाहीसाठी हजारो जाती शेकडो धर्म आणि पंथ यासाठी धोक्याची घंटा असेल.
टीम जागल्या भारत
एका रात्रीत वातावरण बदलणारे राकेश टिकैत कोण आहेत ? त्यांच्याबद्दल जाणून घ्या
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)