आठ जानेवारीलाच बौद्ध धम्म ध्वज दिन का साजरा केला जातो याचा मागोवा आपण घेऊया, तसेच बौद्ध धम्म ध्वजातील रंगांच्या बाबतीतही आपण या लेखात माहिती घेऊया. पूर्ण जगभर बौद्ध धम्माचे अनुयायी पसरले आहेत. बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रमाण आशिया मध्ये जास्त आहे तसेच युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया या खंडातही बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत.
संपूर्ण जगभर अनुयायी असल्याकारणाने बौद्ध धम्माच्या बाबतीत धम्म विचार प्रसार करणे बाबत तसेच सर्व जगभरात बौद्ध धम्माचा एकच ध्वज असावा असे मत/ठराव 1880 साली पुढे आला.
याच विचाराने प्रेरित होऊन श्रीलंकेचे भदन्त सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा,अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर भदन्त गुणानंद या भंतेजींनी 1880 साली जागतिक बौद्ध धम्म ध्वज तयार केला.
8 जानेवारी 1880 रोजी त्या ध्वजाला जागतिक बौद्ध धम्म ध्वज म्हणून मान्यता दिली.
8 जानेवारी 1880 पासून जगभरात विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन साजरा केला जातो.
बौद्ध धम्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला सर्व जगभरात मान्यता आहे.
अनेक देशांमध्ये त्या त्या देशाचे धम्माचे ध्वज हे वेगवेगळे असले तरी विश्व बौद्ध धम्म ध्वज हा एकच आहे.
जपानमध्ये, चायना मध्ये थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, धम्माचे ध्वज हे जरी वेगवेगळे असले तरी ते लोकही विश्व बौद्ध धम्म ध्वज यालाही मानतात. भारतामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र परिवर्तनानंतर इथल्या आंबेडकरी बौद्ध बांधवांच्या राजकीय ओळखीसाठीचा ध्वज हा निळ्या रंगाचा असून त्यात अशोक चक्र आहे. त्यासोबतच विश्व बौद्ध धम्म ध्वज देखील फडकवला जातो.
आपण विश्व बौद्ध धम्म ध्वज मध्ये वापरलेल्या रंगांचे आणि त्या पाठीमागील भावार्थ समजून घेऊ.
विश्व बौद्ध धम्मात ध्वजामध्ये पहिला रंग जो येतो तो निळा रंग आहे.
निळा रंग हा उत्साहाचे प्रतीक आहे, समानतेचे प्रतिक आहे, व्यापकतेचे प्रतीक आहे.
आकाशाचा रंग निळा असतो त्याचा अर्थाने निळा रंग बौद्ध धम्म ध्वजामध्ये वापरला आहे.
यानंतर दुसरा जो रंग आहे तो रंग म्हणजे पिवळा रंग होय.या रंगाचा भावार्थ म्हणजे पिवळा रंग हा मध्यम मार्गाचे प्रतीक आहे.
आर्यअष्टांगिक मार्ग जीवनात अंगीकारून त्याच पद्धतीने बौद्ध धम्माचे पालन करून जीवन सुखी आणि समृद्धीने जगावे यासाठी पिवळा रंग बौद्ध धम्म ध्वजमध्ये वापरला आहे.
या नंतरचा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग आहे लाल रंगाचा भावार्थ असा की हा रंग दृढनिश्चयता,
गतिशीलता आणि सतत सत्कर्म करत राहण्याविषयीचा संदेश देतो.
बौद्ध धम्म पालन करताना आपल्याला धम्मासाठी जे काही शक्य आहे ते करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी हा रंग वापरला आहे.
नंतरचा जो रंग आहे तो म्हणजे शुभ्र रंग.हा रंग शांततेचे प्रतीक आहे.
शुद्ध चारित्र्य ठेवून शांततेच्या मार्गाने धम्माच्या वाटेवर तथागत भगवान बुद्धांच्या विचाराने चालत राहणे यासाठी हा रंग वापरला आहे.
मन काया वाचा हे शुद्ध राखण्यासाठी या पांढऱ्या रंगाचा अंतर्भाव केला आहे.
सगळ्यात शेवटचा जो रंग आहे तो म्हणजे भगवा रंग आहे. भगवा रंग हे त्यागाचे प्रतिक आहे.
भगवा रंग हे तथागतांचे प्रतीक आहे.भगवा रंग म्हणजे ज्ञानाचे प्रतिक आहे. भगवा रंग म्हणजे तथागतांच्या धम्माचे प्रतिक आहे .बुद्धिप्रामाण्यवाद ,शिक्षण ,प्रज्ञा, शील या सर्वांचा अंतर्भाव या भगव्या रंगात केलेला आहे. सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धांनी जे मार्ग आपल्याला धम्मा द्वारे दिलेले आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी भगवा रंग हा तथागतांचा रंग आहे. भीमयान वाचकांना येणाऱ्या विश्व बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या हार्दिक सदिच्छा.
हेही वाचा… विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन- एक उत्सव
हेही वाचा… भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08, 2021 08:03 AM
WebTitle – international-buddhist-flag-day