माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य (गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इ.) पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. तरी याकरिता जिल्ह्यातील अनुभवी संस्थांनी आपले अर्ज २१ जानेवारी २०२१ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावेत.
लोककला आणि पथनाट्य सूचीसाठी अर्ज पाठविण्याचे शासनाचे आवाहन
इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमून व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे. अर्जाचा नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून जिल्हा माहिती कार्यालय,
मुंबई आणि उपनगरातील पथकांनी आपले अर्ज उपसंचालक (माहिती),विभागीय माहिती कार्यालय,तिसरा मजला,कोकण भवन,नवी मुंबई येथे पाठवावेत.
अर्जासाठी ही पीडीएफ फाईल पाहा
पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा.
पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा.
लोककला,पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा.
केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नॉंदणीकृत असल्यास प्राधान्य.संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक ते कागदपत्रे जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे 1 जानेवारी 2021 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करण्यात यावेत. जास्तीत जास्त संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)