ईडीची नोटिस हा आता राजकीय परवलीचा मुद्दा झालेला आहे.ईडीची नोटिस अशी बातमी नसेल तर चुकल्यासारखे वाटते.विशेष म्हणजे ईडीची नोटिस विरोधकांच्या पत्यावरच जास्त धडका देताना दिसून येते.आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. आ देखे जरा किसमे कितना है दम -राऊतांनी सूचक ट्विट केले आहे.मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
दरम्यान,या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती.या नोटिस प्रकरणानंतर संजय राऊत यांनी “आ देखे जरा किसमें कितना है दम” असं सूचक ट्विट केले आहे.
नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री
आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे.
तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत,अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत,
“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं सांगितलं होतं.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)