विश्वाचे आर्त हे पुस्तक आपल्याला खुल्या मनाने आणि व्यापक दृष्टिने जगाकडे पर्यावरण डोळस पणे बघायला शिकवतोय कारण संध्या अनेक तऱ्हांच्या विषमतेने जगाला घेरले असून या मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.आर्थिक महामंदी, हवामान बदल या सारखी महाकाय संकटे व सर्वसामान्य माणसाला, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शौचालय, शिक्षण, आरोग्य, या मुलभूत सुविधा ची वानवा अशा स्थूल आणि सुक्ष्म समस्यांचा आव्हानांचा एकाच वेळी सामना करतांना सामान्य माणसांचे पेकाट मोडून गेले आहे.
जैवविविधता जपण्याचे धोरण
काळाच्या ओघात नेते, अधिकारी, धोरणकर्ते या सर्वांनी गरिबांना, शोषित कष्टकरी ,पीडित, दलितांना वंचित “डिस्कनेक्ट” केले आहे.
मी, मी, आणि केवळ मीच! ही जगण्याची रीत झाली आहे.समाजाला, देशाला, व जगाला, हे “स्व-तंत्र “तापदायक त्रासदायक होतोय.
या मार्गाने पुढे गेल्यास पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे.
समाज मनातील भूस्तरांच्या हालचालींचा वेग विलक्षण प्रचंड वाढला असून या पुढेही देशात,
जगात मोठे सामाजिक भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत.एॅमेझान मधील जंगलाला लागलेली आग हे तेच दर्शवितोय.
“एकविसाव्या शतकाचे भवितव्य पर्यावरणाच्या अवस्थेवर अवलंबून असणार आहे ” आपल्या भागातील जैवविविधतेचे महत्त्व, तिचं जतन करण्याची पध्दत यांच ज्ञान स्थानिक जनतेलाच असतं पीक, पाणी, औषधी वनस्पती मासे प्राणी यांना शतकानुशतके अबाधित ठेवून त्यांना जपले जोपासले आहे ,त्यांना प्रोत्साहित करण्यासारखे वातावरण आपण निर्माण केले नाही हे आपल्या विकसित म्हणण्यार्या समाजाचे अपयश आहे.. उलट त्यांना आपण आपल्या संकल्पनेच्या मुख्य प्रवाहात ओढण्याकरिता सदैव उतावीळ असतो. त्याना विचारण्यापेक्षा रेटून सांगण्याचा आपला अधिकार असल्याची आपली समजूत होती, ती आपली घोडचुक होती ही सिध्द झाल्यावर स्थानिक आदिवासींच्या साथीनंच भारतातील जैवविविधता जपण्याचे धोरण ठरवून कृतीला सुरवात केली पाहिजे.
पर्यावरणीय कारणांमुळे समाज व सिव्हिलायझेशन संपून गेले आहेत
आदिवासीच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांना मुख्य विकासाच्या प्रवाहात आणलं नाही तर ते नक्षलमार्गाने वाटचाल करतात, हे वारंवार कळूनसुध्दा वळत नाही हे आपले दुर्दैव आहे.महात्मा गांधी नेहमी म्हणत निसर्ग, पर्यावरण, पृथ्वी आपल्या गरजा पूर्ण करू शकतो पण हाव नाही या पुस्तकातील लेख, पृथ्वीचे मारेकरी, पर्यावरणवादी दहशत वाद, कोरड, भुकेचा ज्वालामुखी… तसंउगवेल, शतकाचा कौल, हवामान बदलाचा संक्षिप्त इतिहास, अत्यंत वाचनिय व वास्तविक असून आपल्या जाणीवा व्यापक करणाऱ्या आहेत.
काळाच्या ओघात पर्यावरणीय कारणांमुळे समाज व सिव्हिलायझेशन संपून गेले आहेत. सिंधू संस्कृती लयाला जाण्याच्या विविध शक्यता सांगितल्या जातात, शेती उन्नत करणाऱ्या सिंधू खोर्यातील विपुल पाऊसमान बदलले कोरडे झाले.हवामान बदलामुळे मान्सून क्षीण झाला. सातत्याने पुरामुळे मातीला मीठफुटी झाल्यान शेती धोक्यात आली.नद्यांनी पात्र बदलल्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले, महापुरामुळे गावच्या गाव पाण्याखाली गेली.
भविष्यात पाण्यासाठी युध्द होण्याची परिस्थिती आहे
विपुल अन्नधान्यसाठी प्रसिद्ध असलेल्या सुमेरियन सभ्यतेला पर्यावरणीय संकटातून सावरता आले नाही, हवामान बदल सुर्य आग ओकु लागला, पाण्याचे बाष्पीभवन वाढले माती क्षारमय झाली .आणि अन्न पिकवणं दुरापास्त झाले.विवेकापासून फारकत घेऊन” विकास “होत गेला, भविष्याचा विचार न करता त्या क्षणी मनात येईल तसं वर्तन हा व्यक्ती व समाजाचा स्थायीभाव झाला. हे “अविवेकी पर्व “वारंवार अधोरेखित होत आहे.
“पाण्यावाचून माणूस तडफडतो, परंतु पाण्याला कवडीची किंमत नाही. हिराचा अजिबात उपयोग नसून तो अनमोल आहे. हा मानवी संस्कृतीकरता क्रूर विरोधाभास आहे “हे अर्थतत्वज्ञ अँडम स्मिथ यांचे, “अँन एन्कवायरी इन टु द नेचर अँन्ड काँजेस आफँ द वेल्थ आफ नेशन्स ह्या ग्रथांमधील अवतरण आज खरे ठरत आहे, भविष्यात पाण्यासाठी युध्द होण्याची परिस्थिती आहे.
“आजकाल प्रत्येक वस्तूची किंमत लोकांच्या लक्षात येते,परंतु कशाचेही मूल्य समजत नाही. हे आँस्कर वाइल्ड म्हणतो ते खरे आहे म्हणून ही जगभरात पर्यावरणाविषयी बेबंदशाही सुरू आहे.हवामान बदलामुळे कित्येक संस्कृतींचा अस्त झाला.
पाण्यामुळे त्या बहरल्या व पाण्या अभावी नष्ट झाल्या. हा इतिहासाचा धडा पुन्हा गिरवणार ?
पर्यावरणीय समस्यांचं स्वरुप जागतिक असून त्याच आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे.
आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत, जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे.
हे विश्वाचे आर्त आहे. मग वाचायला हवे डोळस बनायला हवे.
पुस्तकांचे नाव – विश्वाचे आर्त
लेखक – मा. अतुल देऊळगावकर
प्रकाशन – मनोविकास प्रकाशन
लेखन – विकास परशराम मेश्राम
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)