हुबळी (धारवाड जिल्हा): 24-12-2025 | हुबळी मध्ये आंतरजातीय विवाहामुळे गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या; वडिलांकडून ऑनर किलिंगचा संतापजनक प्रकार — कर्नाटकातील हुबळी तालुक्यातील इनाम वीरपुरा गावात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी आपल्या २० वर्षांच्या गर्भवती मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव मान्या पाटील असून ती सात महिन्यांची गर्भवती होती. या अमानुष हल्ल्यात तिच्या पोटातील न जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.

हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी अवस्थेत मन्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
मान्या पाटील हिने मे २०२५ मध्ये गावातीलच दलित समाजातील तरुण विवेकानंद दोड्डामणी याच्याशी प्रेमविवाह केला होता. मान्या लिंगायत समाजातील होती, तर विवेकानंद दलित (मादर) समाजातील आहे. या आंतरजातीय विवाहाला मान्याच्या कुटुंबीयांचा, विशेषतः तिचे वडील प्रकाशगौडा पाटील यांचा तीव्र विरोध होता.
लग्नानंतर जीवाला धोका असल्याने मान्या आणि विवेकानंद हे जोडपे हावेरी येथे राहायला गेले होते.
घटनेपूर्वीची पार्श्वभूमी:
मान्या सात महिन्यांची गर्भवती असल्यामुळे बाळंतपणासाठी तसेच आधार कार्डसह इतर कागदपत्रांच्या कामासाठी ८ डिसेंबर २०२५ रोजी हे दाम्पत्य पुन्हा गावी परतले होते. मात्र २१ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळच्या सुमारास मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी विवेकानंदच्या घरी धडक दिली.
या वेळी आरोपींकडे लोखंडी पाईप, स्प्रिंकलर पाईप, कुऱ्हाड आणि इतर धारदार शस्त्रे होती. “जातीबाहेर लग्न करून आमचे नाक कापलेस” असे म्हणत त्यांनी मान्यावर अमानुष हल्ला केला.
मान्याला वाचवण्यासाठी धावलेल्या तिच्या सासू रेणुबाई, सासरे सुभाष तसेच इतर नातेवाईकांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
या सर्वांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात मान्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्या होत्या. तिला तातडीने हुबळीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले,
मात्र रात्री सुमारे ९:३० वाजता तिचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई:
धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. आतापर्यंत मुख्य आरोपी प्रकाशगौडा पाटील, वीरनगौडा पाटील, अरुणगौडा पाटील यांच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात १५ ते २० जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
परिसरात तणावाचे वातावरण,संघर्ष आणि निषेध:
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विविध दलित संघटनांनी हुबळीत निषेध आंदोलन करत पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
विवेकानंद दोड्डामणी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
ही घटना समाजातील जातीय द्वेष, ऑनर किलिंग आणि आंतरजातीय विवाहाविरोधातील मानसिकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करते.
अशा अमानवी घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि सामाजिक जागृतीची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 24,2025 | 20:10 PM
WebTitle – Pregnant Woman Brutally Killed in Hubbali Over Inter-Caste Marriage, Shocking Honor Killing Case























































