जगभरातील आंबेडकरी संस्थांनी केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानांवर तीव्र चिंता आणि खेद व्यक्त केला आहे. बाबासाहेब, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, सामाजिक न्याय आणि समतेसाठी झटणारे एक पूजनीय व्यक्तिमत्त्व आहेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांचे विधान, जे माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहे, बाबासाहेबांच्या अतुलनीय योगदानाला तुच्छ मानणारे वाटते. त्यांनी म्हटले की, “आता अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर म्हणणे फॅशन झाले आहे… जर एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता.” या विधानामुळे विशेषतः वंचित समाजातील लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत, ज्यांच्यासाठी बाबासाहेब सामाजिक सशक्तीकरणाचे प्रतीक आहेत.
बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांची दूरदृष्टी ही भारतीय लोकशाहीचा पाया आहे. त्यांनी न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित राष्ट्राची कल्पना केली. भारतीय संविधानाच्या मूळ निर्मात्यांपैकी प्रमुख असलेल्या बाबासाहेबांनी जात, पंथ, लिंग किंवा धर्मभेद न करता प्रत्येक नागरिकाला समान हक्क देणारे राष्ट्र निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आणि वारशाचा अवमान करणे म्हणजे संविधानाच्या तत्त्वांचा अपमान होय.असे या संस्थांनी म्हटले आहे.
तत्काळ पुढील कृती करण्याची मागणी केली आहे
श्री अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी आणि भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे.
सरकारने बाबासाहेबांनी मांडलेल्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या तत्त्वांचे पालन करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करावी.
भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी सार्वजनिक अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवावेत.
संस्थांनी पुन्हा एकदा नमूद केले की, बाबासाहेबांचा वारसा हा एका समाजाचा नाही, तर संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहे.
तो प्रत्येक नागरिकाने, विशेषतः सत्तास्थानी असलेल्या व्यक्तींनी सन्मानपूर्वक पाळला पाहिजे.
The undersigned organizations express grave concern and deep disturbance over recent remarks made by Shri Amit Shah, the Honorable Union Home Minister, regarding Babasaheb Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Babasaheb, the principal architect of the Indian Constitution, is a revered figure who tirelessly fought for social justice and equality.
Shri Amit Shah’s statement, which has been widely reported in the media, appears to trivialize Babasaheb’s monumental contributions. His words, “It has now become a fashion to say- Ambedkar, Ambedkar, Ambedkar…If you recite this many times of God name, you will attain heaven for seven lifetimes,” have hurt the sentiments of millions of Indians, especially those from marginalized communities who view Babasaheb as an icon of empowerment.
Babasaheb Dr. B.R. Ambedkar’s legacy is a cornerstone of India’s democracy. He envisioned a nation built on the principles of justice, equality, and fraternity. As the primary drafter of the Indian Constitution, he ensured inclusivity and equal rights for every citizen, irrespective of caste, creed, or gender. Any remark that undermines his vision and contributions is not only disrespectful but also an affront to the Constitution’s foundational values.
The following actions are urgently requested:
A public apology and clarification from Shri Amit Shah to address the hurt caused to millions of Indians.
A reaffirmation of the government’s commitment to uphold the principles of equality, justice, and fraternity, as championed by Babasaheb.
Initiatives to raise awareness about Babasaheb Dr. Ambedkar’s contributions among public officials and citizens to prevent such incidents in the future.
The organizations reiterate that Babasaheb’s legacy is a national treasure, transcending communities, and must be honored by all, especially those in positions of power.
The below-signed organizations remain hopeful that respect for Babasaheb Dr. Ambedkar’s unparalleled legacy will prevail.
Yours sincerely,
NRI Ambedkarite https://chng.it/6jTmpZcwXW
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 21,2024 | 12:20 AM
WebTitle – condemnation-remarks-amit-shah-babasaheb-ambedkar