झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पलामू येथे भव्य जनसभेला संबोधित केले आणि राहुल गांधींना कडक इशारा दिला. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण मिळणार नाही. त्यांनी म्हटले की, काँग्रेस पार्टी आरक्षणाबद्दल बोलते. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नाही. आम्ही कधीही कोणत्याही धर्माला विशेष आरक्षण देऊ शकत नाही.
अमित शाह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात उलेमांचा एक गट त्यांच्या (काँग्रेसच्या)कडे गेला आणि मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना आश्वासन दिले की, आम्ही यामध्ये तुम्हाला मदत करू.
जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण मिळणार नाही – अमित शाह
अमित शाह यांनी म्हटले की, मी झारखंडच्या जनतेला विचारायला आलो आहे की, जर मुस्लिमांना १० टक्के आरक्षण दिले गेले तर कोणाचे आरक्षण कमी होईल?
मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण कमी होईल. मी इथून राहुल गांधींना चेतावणी द्यायला आलो आहे.
राहुल बाबा, तुमच्या मनात जे काही कटकारस्थान असेल, जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्यकांना आरक्षण मिळणार नाही.
अमित शाह यांनी आरोप केला की, “राहुल गांधी संविधानाची प्रति दाखवतात. दोन दिवसांपूर्वी त्यांचा पर्दाफाश झाला. कोणाला त्यांच्याकडील संविधानाची प्रत मिळाली होती, ज्यामध्ये मुखपृष्ठावर ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले होते, परंतु आतमध्ये काहीच नव्हते. संविधानाचा अपमान करू नका. हा विश्वासाचा मुद्दा आहे. संविधानाची बनावट प्रति दाखवून, तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचा अपमान केला आहे. काँग्रेसने संविधानाला एक खेळ बनवले आहे.”
भाजप कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देणार नाही
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाह यांनी आरोप केला की, काँग्रेस “ओबीसी, आदिवासी आणि दलित यांचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे”
आणि “ते अल्पसंख्यकांना आरक्षण देण्याची योजना आखत आहेत.”
ते म्हणाले की, “काँग्रेस अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाविरोधात आहे. महाराष्ट्रात उलेमांच्या एका शिष्टमंडळाला भेटून त्यांनी अल्पसंख्यकांना १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देणार नाही.”
भ्रष्ट लोकांना उलटे लटकवू
कश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करण्याच्या काँग्रेसच्या कथित प्रयत्नांवरही शाह यांनी हल्ला चढवला. शाह म्हणाले, “कश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी राहुल गांधींना आव्हान देतो की, तुमची चौथी पिढी आली तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही.” झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीवरही त्यांनी टीका केली आणि तिला “देशातील सर्वात भ्रष्ट सरकार” म्हटले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, “मुख्यमंत्री म्हणतात की घुसखोरी हा भाजपा चा राजकीय अजेंडा आहे. मी म्हणतो की हा त्यांचा मतदारसंघ आहे. भ्रष्ट लोकांना उलटे लटकवू.”
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 09,2024 | 16:15 PM
WebTitle – “As long as there is BJP, there will be no reservation for muslims ”; Amit Shah