पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स च्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. पूर्णिया पोलिस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी हाट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी मोठा खुलासा केला असून, दिल्लीमधून महेश पांडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीकडून त्याने वापरलेले मोबाइल आणि सिमही जप्त करण्यात आले आहे. पूर्णिया एसपींनी सांगितले की, महेश पांडे याचा कोणत्याही गँगशी संबंध नाही, मात्र तो यापूर्वी मोठ्या नेत्यांसाठी काम करत होता. माध्यमांद्वारे माहिती मिळाल्यानंतर त्याने यूएईमध्ये राहणाऱ्या आपल्या मेहुणीच्या सिमचा वापर करून हा संपूर्ण कट रचला. या प्रकरणात आणखी खुलासे होतील असेही पूर्णिया एसपींनी सांगितले. त्यांनी सांगितले की महेश पांडे याला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे.
धमकी मिळाल्यानंतर मागितली होती सुरक्षा
काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी सलमान खानला लॉरेन्स गँगकडून मिळणाऱ्या धमकीसंदर्भात पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लॉरेन्स गँगला आव्हान देत त्याच्या नेटवर्कला 24 तासांत संपवण्याची घोषणा केली होती. या घटनेनंतर काही दिवसांनीच पप्पू यादव यांना कथित कॉल आला, ज्यामध्ये लॉरेन्सच्या गुंडांनी त्यांना गंभीर परिणामांची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी स्वतःसाठी केंद्राकडून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सध्या पप्पू यादव यांना वाय श्रेणीची सुरक्षा मिळालेली आहे, मात्र आता ते झेड श्रेणीची सुरक्षा मागत आहेत.
पप्पू यादव यांनी एक्स अकाउंटवर लिहिले होते –
13 ऑक्टोबरला पप्पू यादव यांनी ट्वीट केले होते, “एक गुन्हेगार सर्वांना धमकावत आहे. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचे प्रमुख, आता एका उद्योगपती नेत्याला मारले. कायदा परवानगी देत असेल, तर 24 तासांत लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाच्या संपूर्ण नेटवर्कला मी संपवेन.” मात्र, हीच धमकी पप्पू यादव यांच्यावर उलटली.
“हा देश आहे की नपुंसकांची फौज? एक गुन्हेगार जेलमध्ये बसून लोकांना धमकावत आहे, लोक मूकदर्शक आहेत. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचे प्रमुख, आता एका उद्योगपती नेत्याला मारले. कायदा परवानगी देत असेल तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाच्या संपूर्ण नेटवर्कला 24 तासांत संपवेन.” सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पप्पू यादव यांनी केलेल्या या पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 02,2024 | 21:58 PM
WebTitle – Man Arrested for Threatening Pappu Yadav in the Name of Lawrence; Accused Used Sister-in-Law’s SIM from UAE for Plot
#PappuYadav #LawrenceGang #DelhiPolice #ThreatCase #IndiaNews #LawrenceBishnoi #CrimeNews #PappuYadavThreat