पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज (शुक्रवारी) अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. गुरुवारी पहाटे त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात होती. विविध समाजातील लोक त्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करत होते. अशातच महाविकास आघाडीचे प्रवक्ते आणि त्यांच्यासाठी ‘निर्भय बनो’च्या सभा घेणाऱ्या ॲड. असीम सरोदे यांनी कुत्सित बुध्दीने ॲड. आंबेडकर यांच्यावर टीका करून त्यांचा अमानवी चेहरा दाखवला आहे.
ॲड.असीम सरोदे यांनी सोशल मिडियावर हिणकस पोस्ट केल्याने आंबेडकरी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वर्तवणुकीमुळे जनतेच्या भावना दुखावल्याचे समाज माध्यमांवर दिसत आहे. शत्रूच्या अवघड काळात सुद्धा औचित्यभंग होऊ नये, याची काळजी घेणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तरी सुद्धा कुत्सित हेतूने अशा काळात टीका टिपण्णी आणि राजकारण करणे यामुळे सरोदे यांच्यावर समाज माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सक्रिय राजकीय नेत्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना करत त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. मात्र, अशा काळात स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या सरोदे यांनी मात्र हा भलताच प्रताप केल्याचे दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपली बौद्धिक दिवाळखोरी सरोदे यांनी दाखवली असेच म्हणावे लागेल.
सरोदे यांच्या या प्रतापामुळे जनतेमध्ये रोष वाढला असल्याने ॲड.असीम सरोदे यांनी ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या अँजिओप्लास्टी संदर्भातील वादग्रस्त पोस्ट डिलीट केली.
मतभेद असावेत पण सरोदे यांना आंबेडकर नावाचा एवढा द्वेष का असावा ? असा सवालही जनतेमधून विचारला जात आहे.
काय होती असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट?
असीम सरोदे डिलिट केलेली फेसबुक पोस्ट जागल्याभारत च्या हाती लागली आहे,त्यातील भाषा मानवीय पातळीवर खरोखर अमानवी वाटावी अशीच दिसते.
या त्यांच्या कुत्सित वर्तवणुकीवर समाज माध्यमांवर नागरिकांनी मांडलेली मते –
तुमची काळजी करण्याची पद्धत योग्य नाही
त्यात कुत्सित भावना दिसते. साहेब ऍडमिट आहेत कार्यकर्ते प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. त्यात तुम्ही असे शाब्दिक चिमटे काढता मग कोणी काही बोलले की बोलता आम्हाला ट्रोल केलं गेलं. तुमच्या हृदयाला पण येतात लगेच उर बडवायला एकाला काही झालं की….
उगाच निवडणुकीच्या तोंडावर असे काही वागू नका जनता हुशार आहे त्यांना सगळं कळतं.
- सुशांत जाधव
संविधानाची चौकट तुम्हालाच कळते असा आव आणू नका. पोस्टमध्ये काळजी ऐवजी कुत्सित भावनाच दिसत आहे.
- तेजस संगीता मिलिंद गंगावणे
तुमच्या शुभेच्छा आणि काळजीवर दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद..
शेवटची ओळ ही पूर्णपणे राजकीय आहे, इतकी राजकीय ओळ सक्रिय राजकारणात असलेल्या एकाही व्यक्तीने उच्चारली नाही.
सर प्रत्येक गोष्टीत राजकारण या मानसिकतेतून बाहेर या. Get well soon sir
- सुनील शोभा गणेशराव कोकणे
इतका द्वेष ?
शुभेच्छा देतानाही आंबेडकर घराण्याच्या आणि सर्व समाजाच्या भावना दुखावल्या जातील याची काळजी घेतली गेली. असीम सरोदे हा एक द्वेषी, राजकारणी, मतलबी आणि नीच मानसिकतेचा वकील म्हणून याची इतिहासात नोंद नक्की होईल. यांच्या मेंदूत द्वेषभावना कमी होऊन सद्भावना जागृत होवो अशी मी प्रार्थना करतो.
एम. डी. हिरोळे
महाविकास आघाडीच्या आस्मनातला सरड्या असं नाव जरी ठेवलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही या महाशयांना लाज वाटली पाहिजे. आम्हाला या गोष्टी अपेक्षित आहेतच कारण का तर हे गृहस्थ महाविकास आघाडीचे दलाल असल्यासारखे करतात….! आजपर्यंत असं ऐकण्यात आलं होतं की दुःखात कोणी राजकारण करत नाही आणि प्रस्थापितांना पूरक असं राजकारण कराल असे कुणी सल्ले सुद्धा देत नाही…., फक्त आपण मनोकामना करतो ते सुदृढ निरोगी आयुष्य स्वास्थ्य निरोगी राहतील.., याचीच खंत आज आम्हाला वाटायला लागली आहे… की स्वतःला आंबेडकरी चळवळीचा पाईक आणि विधीज्ञ म्हणून घेणारा हा आस्मानातला सरड्या म्हणजेच असीम सरोदे आज दुःखद सुद्धा सल्ले देत सुटलाय या गृहस्थांना लाज वाटायला हवी याच्या घरातलं जर आज कुणी या परिस्थितीत असतं तर हा असेच सल्ले देत सुटला असता का? महाविकास आघाडीचा दलाल…. म्हणून यांना प्रस्थापितांचे दलाल म्हणणेच योग्य ठरेल..
- योगेश सुभाष इंगोले
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 01,2024 | 16:40 PM
WebTitle – Adv. Ambedkar Undergoes Angioplasty Adv. Asim Sarode Shows Inhumane Attitude
#AdvAmbedkar #Angioplasty #AsimSarode #Controversy #HealthcareRights #Humanity #AdvocateNews #NirbhayBano