रत्नागिरी : उद्घाटनाआधीच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचे पीओपी कोसळले : रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला उद्घाटनाच्या आधीच मोठा फटका बसला आहे. रविवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने रेल्वे स्थानकाच्या छताला लावलेल्या पीओपी चे तुकडे खाली कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही दुर्घटना सुशोभीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण करते.
या स्थानकाचे सुशोभीकरण राज्य शासनाच्या निधीमधून केले जात आहे, आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांतच या कामाचे लोकार्पण होणार होते. मात्र, उद्घाटनाआधीच पीओपीचे काही भाग कोसळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानकाच्या मुख्य भागात पीओपीचे तुकडे खाली पडत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
छताचे तुकडे पत्त्याच्या बंगल्यासारखे खाली कोसळत असल्याचे दिसून आले
सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू असून, निवडणुकीपूर्वी लोकार्पण करण्याच्या घाईमुळे हे काम युद्धपातळीवर चालू आहे.
मात्र, या घटनेनंतर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले असून, छताचे तुकडे पत्त्याच्या बंगल्यासारखे खाली कोसळत असल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क होणे आवश्यक आहे.
मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून सुरू केलेल्या या कामात सुरक्षेची आवश्यक काळजी घेणे अत्यावश्यक आहे,
अन्यथा भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहू शकतो.
काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधिल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता.2023च्या नौदल दिनानिमित्त हा पुतळा उभारण्यात आला होता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 07,2024 | 13:54 PM
WebTitle – POP Ceiling Collapses at Ratnagiri Railway Station Ahead of Inauguration