राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तापू लागला आहे.मराठा आरक्षणाला स्थगिती मिळून आता महिना उलटला आहे. 9 सप्टेंबर 2020 ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला ‘तूर्तास स्थगिती’चा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गेल्या महिन्याभरात मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्यास सुरुवात झाली.काही ठिकाणी धरणे आंदोलन करून झाले. घेराव घालून झाला.मात्र यावेळी पूर्वीप्रमाणे जोर असलेला दिसत नाही.संविधान बदल संदर्भात खासदार संभाजी भोसले यांचे स्पष्टीकरण आले आहे.
“घटना दुरुस्ती” ऐवजी “घटनेत बदल”
यावेळीही मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यानी समर्थन दिले. मात्र मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे. तर आंबेडकरी समाजाच्यावतीने एड.प्रकाश आंबेडकर यांनीही मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे.मराठा आरक्षणासाठी आम्ही मदतही करायला तयार आहोत,असेही ते म्हणाले.परंतु सध्या काही मराठा नेते मराठा आरक्षणाच्या नावाखाली वेगळेच राजकारण करत आहेत. भलतीकडेच जात आहेत.असेही त्यांनी सांगितले त्यावर त्यांनी टीका केली. त्यानंतर काही काळ त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही आल्या.
दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजी भोसले हे पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना माध्यमांशी बोलताना ,बोलण्याच्या ओघात “घटना दुरुस्ती” ऐवजी “घटनेत बदल” असा शब्द वापरल्याने त्यांच्यावर राज्यभरात टीका सुरू झाली.प्रसारमाध्यमांनी काल दिवसभर हेच वाक्य हाइलाईट केल्याने लोकानी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला त्यामुळे भाजपच्या या खासदारांना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले म्हणने स्पष्ट केले आहे.
अभ्यास करून पावले उचलणार
“आत्ताच मी पुरग्रस्त भागाची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. आणि मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेल्या बातम्या दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे. मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना ‘दुरुस्ती’ ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्ध्तीने बातम्या लावल्या. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करून पावले उचलणार आहे.”
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1705159146308964
मराठा आरक्षणच्या मुद्यावर मराठा समाजातील नेत्यांमध्ये अंतर्विरोध दिसून येतात.
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकाराने
03 OCT 2020 रोजी पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली.
या बैठकीला खासदार उदयन भोसले गैरहजर राहिले.
यावेळी उदयनराजेंना तातडीचं काम आलं की आणलं गेलं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली होती.
त्यानंतर मराठा नेत्यांमध्ये एकवाक्यता यावी यासाठी नवी मुंबईत 07 OCT 2020 रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.नरेंद्र पाटील यांनी या बैठकीला सातारचे उदयन भोसले आणि कोल्हापूरचे संभाजी भोसले हे दोन्ही भाजपचे खासदार हजर राहणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.मात्र, या बैठकीला उदयनराजे यांनी पाठ फिरवली.
आरक्षण स्थगितीमुळे मराठा समाजात नाराजी आहे.जोपर्य़ंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठा समाजातील काही नेत्यांनी मागणी करत 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्यावरगृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हीडिओ ट्वीट करून जाहीर केलं की, पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला ठेवून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली
त्यानतंर 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली.
200 जागांसाठी होणारी ही परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी नियोजित होती.MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतर
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले,
तर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
भरती-परीक्षा इत्यादी पुढे ढकलत असल्यानं इतर समाजात नाराजी वाढली.
तसेच सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली होती.
मराठा आरक्षणच्या मागण्या आणि त्या अनुषंगाने होणारे वेगळ्याच मुद्यांवरील राजकारण पाहता
आरक्षणाचा मुद्दा मागे पडून दुसरेच राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आणि भरतीसाठी धडपडणाऱ्या तरुण उमेदवारांच्या भवितव्याचेच नुकसान करणारे आहे.
by टीम जागल्या भारत
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)