देशातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत ओडिसा मधिल शोएब अफताब या विद्यार्थ्यांने ७२० पैकी ७२० गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर दिल्लीच्या (NEET)आकांक्षा सिंह ने सुद्धा ७२० पैकी ७२० गुण मिळवले मात्र तिचा रॅंक दूसरा लावण्यात आला.
या परीक्षेसाठी देशभरातून १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ ऑक्टोबर रोजी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. निकालानंतर देशभरातून सात लाख ७१ हजार ५०० विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यात मुलींची संख्या चार लाख २७ हजार ९४३ इतकी आहे.
( NEET ) शोएब आणि आकांक्षा सिंह या दोघांनाही समान गुण असताना असे का झाले याबाबत आम्ही पडताळणी केली तेव्हा असं समजलं की आकांक्षाचे वय शोएब पेक्षा कमी आहे,आकांक्षाचं वय 17 तर शोएब चे वय 18 आहे. त्यामुळे आकांक्षाला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
यासोबतच,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आशीष झांट्ये या विद्यार्थ्यांने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एनटीएने आपल्या अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर निकाल जाहीर केला असून.
अखिल भारतीय तृतीय क्रमांक तेलंगानाच्या निकिताने मिळवला आहे.
त्याने 720 पैकी 715 धावा केल्या आहेत.राजस्थानच्या विनीत शर्माला 715 गुणांसह अखिल भारतीय चौथे क्रमांक मिळाला आहे.
हरियाणाच्या अम्रिशा खेतानने पाचवा क्रमांक मिळविला, वरील संपूर्ण यादी आपण वेबसाइटवर पाहू शकता.
सर्वांचे अभिनंदन
by टीम जागल्या भारत
NEET Exam नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश ; जाणून घ्या निर्णय
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)