मा .भगतसिंग कोश्यारी साहेब
राज्यपाल
महाराष्ट्र राज्य ,
मुंबई .
महोदय ,
जय महाराष्ट्र .
१) हिंदुत्व विसरलात का?
२)धर्मनिरपेक्ष झालात का?
३) मंदिरे खुली न करण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत येतात का?
साहेब,हा तुमच्या पत्रातील स्वैर अनुवाद आहे.
हे राज्यपाल महोदयांच पत्र आहे की एखाद्या आखाड्यातील साधू बाबाचं पत्र आहे असा सुरवातीला भास झाला. नंतर भानावर आलो.
कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन येत नाही
भगतसिंग कोश्यारी साहेब , असं जाणून-बुजून का वागत आहात आपण ? त्या राज्यपाल पदाचा फालुदा कशाला करून टाकलाय आपण ? नशिबाने चांगलंचुंगलं खायला मिळतंय तर खा की . लोकशाही व्यवस्थेत राजेशाही थाटात राहायला मिळतंय तर मस्त रहा की . लोकांच्या करातून सगळी हौस मौज करायला मिळते तर गप्प बसा की . कशाला काड्या घालताय . का उगाचच पहिल्या दिवसापासून सरकारशी संघर्षाच्या पवित्र्यात आहात ? मोदी साहेबांच्या जीवावर उड्या मारू नका . अहो सत्ता आज आहे उद्या नाही . कोणी सत्तेचा अमर पट्टा घेऊन येत नाही .
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपण एक संविधान विरोधी पत्र पाठविले.त्याला मुख्यमंत्र्यांनी जशास तस उत्तर दिलं.त्यांनी सौम्य भाषेत तुमची जागा तुम्हाला दाखवून दिली .
एक संविधानप्रेमी मराठी माणूस म्हणून आमचे सुद्धा कर्तव्य आहे म्हणून हा पत्र प्रपंच . साहेब ,सध्या महाराष्ट्रात सगळं गुण्यागोविंदाने चांगलं चाललं असताना आपण उगाचच महाराष्ट्र अस्थिर करण्याचा कुटील आणि भेकड डाव का खेळत आहात ? उगाच हात दाखवून अवलक्षण का करून घेताय ?
मुख्यमंत्री म्हणून काय प्रगती केली तुम्ही उत्तराखंडची ?
कृपा करून आपण संविधानाच्या चौकटीत काम करा . चौकटीच्या बाहेर काम करायला लागला तर आपला गाशा गुंडाळून आपल्याला हिमाचल प्रदेशात पाठवाव लागेल . मराठी माणूस जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे . मात्र एकदा का तो चिडला की मग काही विचारू नका .
तुम्ही ज्या उत्तराखंड राज्यातून येता त्या अर्ध्या उत्तराखंड जनतेला हा महाराष्ट्र पोसतोय हे लक्षात असू द्या . तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री होतात ना ? काय दिवे लावले हो तुम्ही ? मुख्यमंत्री म्हणून काय प्रगती केली तुम्ही उत्तराखंडची ?
तुम्हाला धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ समजतो का हो ? संविधान कधी वाचले का हो तुम्ही ? आपल्याला वाचता येत नसेल किंवा चौकडीचे राजकारण करीत असताना वेळ मिळत नसेल तर महोदय राजभवन मधील कर्मचाऱ्यांकडून रोज एक एक तास बसून संविधान तरी समजून घ्या . उगाच त्या कंगना सोबत गुलुगुलु बोलत बसू नका . कॅलेंडरचे उदघाटन करीत बसू नका.फालतू गप्पा-टप्पा करण्यात वेळ घालवू नका . तुम्ही आता भाजपाचे कार्यकर्ते नाही की संघाचे दांडूधारी सेवक सुद्धा नाही.आता तुम्ही संविधानाने बांधलेले राज्यपाल आहात. तुमच्या काही संविधानिक जबाबदाऱ्या आहेत.कर्तव्य आहेत. त्याकडे लक्ष द्या. उगाचच भाजपा कार्यकर्ता असल्यासारखे वागू नका .
राधासुता तुझा धर्म ?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशाविरुद्ध चार पानी लेखी तक्रार सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे .त्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की हे न्यायाधीश महोदय त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे काम करीत आहे .
साहेब ,तुम्ही तर उघड उघड महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे . त्यासाठी अफजलखानी विडा उचलला आहे की काय असेच आपल्या वागण्यावरून दिसून येत आहे . तुम्ही उघड-उघड संविधान विरोधी कर्तव्ये करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुचवीत आहात . त्यांना तुम्ही हिंदुत्वाची जाणीव करून देत आहात .
कोशयारी साहेब जम्मू-काश्मीर राज्यात जेव्हा तुमच्या पक्षाने पाकिस्तान समर्थक मुफ्ती मेहबूबा हिच्यासोबत
सरकार स्थापन केले तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते ? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?
कोशयारीसाहेब राज्यपाल पदाची थोडीतरी ठेवा की राव .जनाची नाही तर मनाची तरी .तुमची मुळातच जडणघडण वेगळ्या विचारसरणीत झाली आहे . परंतु माणूस अनुभवाने शहाणा होत जातो असं म्हणतात. तुमचे बाबा उलटेच व्हायला लागले आहे .
एक लक्षात ठेवा आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय उत्कृष्टपणे ,अप्रतिम काम करीत आहे . तुमच्या कोणत्याही भाजपाच्या मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांची कामगिरी ही अतिशय उच्च दर्जाची ठरलेलीआहे . त्यांची कामगिरी पाहून महाराष्ट्रातील काही चिनपाट मराठी द्वेष्टे , मराठी भैये यांच्या पोटात नुसता गोळा उठला आहे . त्यांना मुळव्याधाचा सुद्धा त्रास होऊ लागला आहे .त्यांना बसता येईना की सांगताही येईना .
पदाचा दर्जा तुम्ही दररोज घालवित आहात
भगतसिंग कोश्यारी साहेब शोषित ,वंचित ,अल्पसंख्यांक , महिला ,विद्यार्थी , शिक्षक या वर्गाचे असंख्य प्रश्न सरकार दरबारी विविध विभागाकडे प्रलंबित आहेत . तुम्ही जरा त्याकडे लक्ष द्या . त्याबाबत सरकारला पत्र पाठवा . सरकारला यासाठी इशारा द्या .त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत राहू साहेब .
शाळा-कॉलेजात परीक्षा कशा होतील ? कशा होत आहेत ? उद्योग कसे सुरु होतील ? याबाबत सरकारशी सल्लामसलत करा . त्यांना मार्गदर्शन करा . ( जर तेवढी माहिती असेल तर ) उगाचच काहीतरी असंविधानिक गोष्टी करत बसू नका . नशिबाने फुकट मिळाले आहे तेव्हा जपून वागा .
भगतसिंग कोश्यारी साहेब तुम्ही जेव्हापासून राज्यपाल झालात ना तेव्हापासून त्या पदाचा दर्जा तुम्ही दररोज घालवित आहात.तुमच्यात आणि गावचा सरपंच यात काही फरकच राहिला नाही . सरपंच गावाच्या पारावर बसून चांडाळ चौकडी सोबत कुचाळक्या करीत बसतो.आणि तुम्हीसुद्धा भाजपाच्या चौकडीला घेऊन राजभवनात राजकारण करीत बसता.फरक तो काय ?
साहेब उगाचच थर्ड क्लास राजकारण करत बसू नका. शहाण्यासारखे वागा.संविधानात जे सांगितलेले कर्तव्य आहे तेवढेच करा .कारण त्यासाठीच तर तुमची नेमणूक आहे हे अजिबात विसरू नका.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा तर आपला डाव नसेल कशावरून ?
उद्धवजी ठाकरेसाहेब हे आता फक्त शिवसेनेचे नेते नसून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखिल आहेत.त्यांची स्वीकारार्हता सगळीकडे वाढत चालली आहे . त्यामुळे तुमच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे .परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा हे सरकार पाच वर्षे टिकणार म्हणजे टिकणार . तोपर्यंत तुमचे पद टिकते का तेवढे पहा . काही व्यक्ती राजकीय मानसिक रुग्ण असल्यासारखे वागतात . तसे तुम्ही कृपया वागू नका .
मंदिर उघडून हिंदूंना मारण्याचे मोठे षडयंत्र तर नाही ना साहेब ?
निवडणुकीसाठी पुलवामा हल्यावर पोळी भाजून निवडणुका जिंकणारे.मंदिर उघडून कोरोना वाढवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा तर आपला डाव नसेल कशावरून ?
एक संविधानप्रेमी मराठी माणूस
by – ऍड . विश्वास काश्यप
माजी पोलिस अधिकारी
मुंबई .
(Disclaimer – येथे व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. हे एक ओपिनियन पीस आहे. jaaglyabharat.com त्यास समर्थन देत नाही किंवा त्यासाठी जबाबदार नाही.)
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)