पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधाच्या जाहिरातीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कंपनीने आता आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेद आणि त्याचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या औषधांच्या जाहिराती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.
विशेष म्हणजे,या माफीनाम्यात पुन्हा जाहिरात प्रसारित न करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. रामदेव बाबाचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या म्हणाले की, आमच्या कंपनीच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती.पुढे ते म्हणाले की, पतंजली उत्पादनांचे सेवन करून नागरिकांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करणे हा आमचा उद्देश होता.मात्र आता, पतंजली आयुर्वेद आणि त्याचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या औषधांच्या जाहिराती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते
पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातीप्रकरणी न्यायालयाने स्वामी रामदेव (पतंजलीचे सह-संस्थापक) आणि पतंजलीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना 2 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. कंपनी आणि आचार्य बाळकृष्ण यांनी न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर दिले नाही, त्यामुळे न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे.
या आदेशामुळे आता त्याना पुढील तारखेला न्यायालयात हजर राहावेच लागू शकते. 19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नोटीस बजावली होती आणि त्याच्यावर अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणाही केली होती. सदर खटल्याची सुनावणी ही न्या. हिमा कोहली आणि न्या.अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी २७ फेब्रुवारीला झाली होती.
27 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर बंदी घातली होती. याशिवाय अवमानाच्या कारवाईत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वास्तविक, न्यायालयाने गेल्या वर्षी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देऊ नका, असे निर्देश दिले होते, परंतु कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कडून 17 ऑगस्ट 2022 रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. याचिकेत म्हटल्याप्रमाणे पतंजलीकडून कोविड लसीकरण आणि ॲलोपॅथी विरोधात नकारात्मक प्रचार करण्यात आला होता. तसेच त्यांनी पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही रोगही बरे करण्याचा खोटा दावा केला होता.
न्यायालयाच्या आदेशानंतरही पतंजलीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
आधीच्या सुनावणीत IMA ने डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिराती न्यायालयासमोर मांडल्या.
याशिवाय 22 नोव्हेंबर 2023 रोजी योगगुरू रामदेव यांच्या पतंजलीचे सीईओ बाळकृष्ण यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेबद्दलही सांगण्यात आले.
पतंजलीकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातींमधून मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला जात होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या एका दिवसानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
21 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले होते – पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या सर्व जाहिराती तात्काळ थांबवाव्या लागतील. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनास गांभीर्याने घेईल आणि उत्पादनावरील प्रत्येक खोट्या दाव्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारू शकते.
न्यायालयाने म्हटले होते- पतंजली दिशाभूल करणारे दावे करून देशाची फसवणूक करत आहे.
गेल्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले होते – पतंजली आपल्या औषधांमुळे काही आजार बरे होतील, असे दिशाभूल करणारे दावे करून
देशाची फसवणूक करत आहे, तर याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही.
पतंजली ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यानुसार निर्दिष्ट केलेल्या रोगांवर
उपचार करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करू शकत नाही.असं स्पष्ट केलं आहे.
न्यायालयाने सरकारला विचारले होते- तुम्ही पतंजलीवर काय कारवाई केली?
ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अंतर्गत पतंजलीच्या जाहिरातींवर काय कारवाई करण्यात आली आहे,
अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली होती. केंद्रसरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) यांनी माहिती दिली की,
या संदर्भात डेटा गोळा केला जात आहे. या उत्तरावर न्यायालयानं नाराजी व्यक्त करत कंपनीच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पतंजली कोविड औषध बनवण्याच्या दाव्याने वादात सापडली होती
रामदेव बाबांनी दावा केला होता की, कोरोनावर उपचार त्यांच्या उत्पादने कोरोनिल आणि स्वसारी ने केले जाऊ शकतात.
एवढेच नाहीतर पतंजली तिच्या इतर काही उत्पादनांच्या बाबतही वादात सापडली आहे.
- 2015 मध्ये, कंपनीने इन्स्टंट आटा नूडल्स लाँच करण्यापूर्वी भारतीय अन्न सुरक्षा आणि नियमितता प्राधिकरण (FSSAI) कडून परवानाच प्राप्त केला नव्हता. यानंतर पतंजलीला अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीसला सामोरे जावे लागले होते.
- 2015 मध्ये कॅन्टीन स्टोअर्स विभागाने पतंजलीचा आवळा ज्यूस पिण्यासाठी अयोग्य असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. यानंतर CSD ने आपल्या सर्व स्टोअरमधून आवळा ज्यूस काढून टाकला होता.
- 2015 मध्येच हरिद्वारमधील लोकांनी पतंजलीच्या तुपात बुरशी तसेच अशुद्धता आढळल्याची तक्रार केली होती.
- 2018 मध्ये देखील, FSSAI ने गिलॉय घनवती या औषधी उत्पादनावर उत्पादनाची तारीख एक महिना पुढे लिहिल्याबद्दल पतंजलीला फटकारले होते.
कोरोनाशिवाय योग आणि पतंजलीच्या उत्पादनांनी कॅन्सर, एड्स आणि समलैंगिकता बरा करण्याच्या दाव्यावरून रामदेव बाबा अनेकदा वादात सापडले आहेत.
BREAKING | #Patanjali | #SupremeCourtofIndia | #BabaRamdev
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 21,2024 | 14:05 PM
WebTitle – Patanjali apologized to the Supreme Court in the advertisement case