कर्नाटक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नेहमी जोर देऊन बोलत असतात, खाऊंगा ना खाने दूंगा’,असं आश्वासन अन घोषणाच प्रधानमंत्री मोदींनी निवडणूक प्रचारात केल्यानंतर ही घोषणा गाजली होती,मात्र विरोधकांकडून सतत भाजपच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले जात होते.कर्नाटक मध्ये झालेल्या विधनसभेच्या निवडणुकीतही विरोधकांनी ४०% कमिशनचा मुद्दा लावून धरला होता आणि याचमुळे इथली भाजपची सत्ता देखील गेली होती.आता याच कर्नाटक मधील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल BJP leader Basangouda Patil Yatnal यांनी पक्षाविरोधातच बंड पुकारून खळबळ उडवून दिली आहे.विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा यांनी अशाप्रकारे भाजपा पक्षाला जाहीरपणे उघड इशाराच दिला आहे. जर मला पक्षातून काढलं तर,मी त्या लोकांची नावं उघड करीन ज्यांनी पैसे लुटले आणि संपत्ती कमावली अशी धमकीच त्यांनी दिली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.येदियुरप्पा यांचं सरकार असताना तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यांनी प्रत्येक कोरोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
आपल्याच सरकारवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप
बसनगौडा पुढे म्हणाले की, “त्यावेळी आमची सत्ता होती.मात्र सत्ता कोणाची होती याने काही फरक पडत नाही.
शेवटी चोर हा चोरच असतो”. येदियुरप्पा सरकारने 45 रुपयांचे मास्क तब्बल 485 रुपयांत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ते म्हणाले की, “बंगळुरु मध्ये त्यावेळी 10 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. याकरिता भाड्यानं 10 हजार बेड्स मागविण्यात आले होते. जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मणिपाल रुग्णालयाने 5 लाख 80 हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस एवढे पैसे कुठून आणणार?”. कर्नाटक च्या तत्कालीन भाजप सरकार कडून झालेल्या तब्बल ४० हजार कोटी रुपयांचे कथित घोटाळ्याचे प्रकरण उघड करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची प्रतिक्रिया
भाजपा आमदारानं केलेल्या या खळबळजनक आरोपांनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचीही प्रतिक्रिया समोर आलीय.
सिद्धरमय्या म्हणाले की, “भाजपाच्याच आमदारानं आम्ही केलेले सर्व आरोप आणि पुरावे खरे ठरवले आहेत”.
भाजपा सरकार हे 40 टक्के कमिशन घेणारे सरकार होतं असा आरोप त्यांनी पुन्हा केला आहे.
“यत्नाल यांच्या आरोपांवरून असे दिसते की आम्हाला वाटत होता त्याच्याही 10 टक्के जास्त भ्रष्टाचार झाला आहे.
भाजपा मंत्र्यांचा गट जो आमच्या आरोपांनंतर ओरडत बाहेर आला होता तो आता कुठे लपून बसला आहे?,” अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 100 पटीने वाढ
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 28,2023 |11:40 AM
WebTitle – I will expose the scams if removed from the party’, BJP leader Basangouda Patil Yatnal