महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीरपणे भारतात राहण्याच्या आरोपावरून आठ बांगलादेशी नागरिकांना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव शहरातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
एका गुप्त माहितीवरून कारवाई करत एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने
गेल्या सोमवारी बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या संशयितांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महबुल नजरून शेख, राणा जमात अली मंडल, गफूर राजेवली शेख, आलमगीर जमात अली मंडल, शालोम मुस्तफिजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जम मुल्ला जमात अली वहायत अली मंडल हे कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करताना आढळले.त्यांच्याकडे भारत बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांकडून भारतात प्रवेश करण्याची देण्यात येणारी परवानगीची कागदपत्रे आढळून आली नाहीत.
बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या ५० हून अधिक अवैध बांगलादेशींना अटक
प्रथमदर्शनी या सर्वांनी देशात घुसखोरी केल्याचा आरोप आहे.
परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून
आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी बेकायदेशीरपणे भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि आता ते नारायणगाव येथे राहत असल्याचे आढळून आले. बहुतेक आरोपी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांत पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधून पोलिसांनी ५० हून अधिक अवैध बांगलादेशींना अटक केली आहे.
त्यामुळे बांगलादेश मधून भारतात येणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न आता चिंतेचा विषय ठरू लागला असल्याचे चित्र दिसत आहे.
संविधान दिन : सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2023 | 14:30 PM
WebTitle – Eight Bangladeshis living illegally in India arrested by Maharashtra ATS in Pune