नवी दिल्ली: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) चांद्रयान मोहिमेववरील विशेष पूरक धड्याच्या मॉड्यूलमध्ये चांद्रयान-3 च्या यशाचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे,तसेच अंतराळ विज्ञानाला पौराणिक कथांशी जोडले गेले असून,वेदांचा संबंधही जोडला गेला आहे.यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
द टेलिग्राफ च्या अहवालानुसार, नर्सरी, इयत्ता I आणि II च्या मुलांसाठी परस्परसंवादी इंटरअॅक्टिव मॉड्यूलमध्ये म्हटले आहे की, ‘चांद्रयान-२ च्या चंद्रावर अयशस्वी लँडिंगमुळे सर्व शास्त्रज्ञांचे मनोबल खचले होते, ते खूप दुःखी होते. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शास्त्रज्ञांचे धैर्य वाढवले आणि त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास सांगितले. सर्व शास्त्रज्ञांनी मिळून भूतकाळातील अनुभवातून शिकून आपल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ‘लँडर’ प्रक्षेपकाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरू शकेल.
NCERT च्या या मॉड्यूलमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाच्या थेट प्रक्षेपणात उपस्थित राहिलेल्या प्रधानमंत्र्यांची छायाचित्रे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बंगळुरू येथील मुख्यालयातील शास्त्रज्ञांसोबतचा त्यांचा नंतरचा संवाद आहे.सोमवारी (17 ऑक्टोबर) दिल्लीतील एका कार्यक्रमात इस्रोचे अध्यक्ष एसपी सोमनाथ यांच्या उपस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते चंद्रयान मोहिमेवरील विशेष वाचन साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाने चांद्रयान-3 च्या विजयात महत्त्वाची भूमिका
मोदींचे कौतुक करताना एका मॉड्यूलमध्ये म्हटलं गेलंय की,
‘माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने चांद्रयान-3 च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली
आणि आपल्या देशाचे नाव चंद्राच्या पृष्ठभागावर आणले.’
अवकाश तज्ञांनी अशा शब्दांचे वर्णन समस्याप्रधान म्हणून केले
टेलिग्राफशी बोललेल्या अनेक अवकाश तज्ञांनी अशा शब्दांचे वर्णन समस्याप्रधान म्हणून केले आहे,
कारण त्यांच्या मते NCERT च्या मॉड्यूलवरून चांद्रयान-3 मोहीम मोदींच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झाल्याचा समज होतो. ते म्हणतात की हे इस्रोच्या अपयशातून सावरण्याच्या ट्रॅक रेकॉर्डच्या विरोधात आहे.
इस्रोच्या इतिहासातील एका अंतराळ तज्ञाने आठवण करून दिली की 1979 मध्ये एजन्सीने प्रक्षेपित केलेले उपग्रह प्रक्षेपण वाहन (Augmented Satellite Launch Vehicle) अयशस्वी झाले होते, परंतु त्यानंतरच्या वर्षी पुन्हा सराव करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
त्याचप्रमाणे, 1987 मध्ये ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल अयशस्वी झाल्यानंतर, इस्रोने पुढच्या वर्षी 1988 मध्ये ते यशस्वी केले.
नंतर ते 1994 मध्ये यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. ISRO च्या (Polar Satellite Launch Vehicle) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या बाबतीतही असेच घडले, जे 1993 मध्ये अयशस्वी झाले परंतु पुढील प्रयत्नात एक वर्षानंतर 1994 मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले.
असे दावे इस्रोच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळत नाहीत
अंतराळ तज्ज्ञ म्हणाले, ‘इस्रोने प्रत्येक अपयशानंतर कधीही हार मानली नाही. तथापि, एनसीईआरटी मॉड्यूलच्या मजकुरावरून असे दिसून येते की पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना आणखी एकदा प्रयत्न करण्यास सांगितल्यानंतरच चांद्रयान-3 लाँच करण्यात आले. हे इस्रोच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळत नाही.
अहवालानुसार, माध्यमिक शाळेतील मुलांसाठी असलेल्या दुसर्या मॉड्यूलमध्ये, पौराणिक कथांना अवकाश विज्ञानासह एकत्रित केले जाऊ शकते.
आपल्या देशाला उडणाऱ्या वाहनांचे ज्ञान होते
मॉड्यूल मध्ये म्हटलंय की , ‘काय वैज्ञानिक उपलब्धी नुकतीच झाली आहे?…
आपलं साहित्य आपल्याला सांगते की याचा शोध विमानिका शास्त्र: ‘विमानशास्त्राचे विज्ञान’ द्वारे घेता येऊ शकतो,
जे दर्शविते की या काळात आपल्या देशाला उडणाऱ्या वाहनांचे ज्ञान होते.
त्यात असेही म्हटले आहे, ‘वेद, जे भारतीय धर्मग्रंथांपैकी सर्वात जुने समजले जाते,
त्यांच्यात प्राण्यांद्वारे ओढण्यात येणाऱ्या रथांचा उल्लेख आढळून येतो,
या रथांवर स्वार झालेल्या विविध देवतांचा उल्लेख आहे, प्रामुख्याने घोडे असणारे हे रथ हवेत देखील उडू शकत होते.“
मॉड्युलमध्ये रामायणात वर्णन केलेल्या पुष्पक विमान या उडत्या रथासारख्या वाहनाचाही संदर्भ देण्यात आला आहे.
असे लिहिले आहे की, ‘देवांचे मुख्य शिल्पकार विश्वकर्मा यांनी ब्रह्मदेवासाठी सूर्याच्या कणांपासून याची निर्मिती केली होती.
ब्रह्मदेवाने ते कुबेरांना दिले.जेव्हा रावणाने कुबेरकडून लंका काबीज केली तेव्हा रावणाने त्याचा वैयक्तिक वाहन म्हणून वापर केला.
समलैंगिक विवाहाला मान्यता नाही,काय झालं कोर्टात सविस्तर जाणून घ्या
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19,2023 | 10:06 AM
WebTitle – The success of Chandrayaan-3 was attributed to Modi in an NCERT module, linking space science with the Vedas