लष्करातील हवालदार शाईन कुमार यांनी रविवारी पोलिसांकडे सहा हल्लेखोरांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. हल्लेखोरांनी त्याचे हात-पाय बांधले. नंतर तोंडावर टेप चिकटवला. मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर हिरव्या शाईने पीएफआय असे लिहिले होते. चौकशीत हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
कोल्लम : केरळमधील कोल्लममध्ये भारतीय लष्कराच्या जवानावर (Indian Army soldier PFI) झालेल्या हल्ल्याचे प्रकरण खोटे असल्याचे समोर आले आहे. केरळ पोलिसांनी लष्करातील जवान आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. दक्षिण केरळ जिल्ह्यात राहणाऱ्या या सैनिकाने यापूर्वी दावा केला होता की त्याच्या घराबाहेर हल्ला करण्यात आला होता. मारहाण केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या पाठीवर हिरव्या रंगाने ‘पीएफआय’ लिहिले होते.मात्र, जवानानेच आपल्या मित्राला मारहाण करून त्याच्या पाठीवर ‘पीएफआय’ लिहिण्यास सांगितले असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. लोकांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी अन चर्चेचा विषय बनण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मित्राला मारहाण करून त्याच्या पाठीवर ‘पीएफआय’ लिहिण्यास सांगितले
लष्करातील हवालदार शाईन कुमार यांनी रविवारी पोलिसांकडे सहा हल्लेखोरांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. हल्लेखोरांनी त्याचे हात-पाय बांधले. नंतर तोंडावर टेप चिकटवला. मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर हिरव्या शाईने पीएफआय असे लिहिले होते. चौकशीत हे संपूर्ण प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, कॉन्स्टेबल शाईन कुमार यांनी केलेला दावा खोटा ठरला. त्याने सांगितले की, त्याच्या मित्राने खोटे विधान करून त्याचे समर्थन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल शाईन कुमार आणि त्याच्या मित्राचे जबाब नोंदवले जात आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबलच्या मित्राने दावा केला आहे की,
शाईन कुमारला प्रसिद्ध व्हायचे होते आणि त्यामुळेच ही संपूर्ण घटना घडवली.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, कॉन्स्टेबलने अशी खोटी विधाने देण्यामागे आणखी अनेक कारणे असू शकतात
सध्या त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
पोलिसांनी शिपायाच्या मित्राच्या घरातून घटनेत वापरलेला हिरवा रंग, ब्रश आणि टेपही जप्त केला आहे.
मी नशेत होतो, म्हणून मी सुरुवातीला DFI लिहिलं
मित्राने दावा केला की शाईन कुमारने त्याला त्याच्या पाठीवर ‘पीएफआय’ लिहिण्यास सांगितले आणि मारहाण केली.
मित्र म्हणाला, “मी नशेत होतो, म्हणून मी सुरुवातीला DFI लिहिलं, पण नंतर मला ते दुरुस्त करून PFI लिहावं लागलं.”
शाइननेही माझ्यावर त्याला मारण्यासाठी दबाव टाकला. पण मी म्हणालो की मी नशेत असल्यामुळे मी हे करू शकत नाही.”
मित्राने दावा केला, “त्यानंतर त्याने मला त्याला जमिनीवर ओढून फेकून देण्यास सांगितले.माझ्या मद्यधुंद अवस्थेत मी ते करू शकलो नाही. म्हणून त्याने मला त्याच्या तोंडावर आणि हातावर टेप लावून निघून जाण्यास सांगितले. मी तसे केले.”
वाचकांच्या माहितीसाठी PFI ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही एक प्रतिबंधित इस्लामिक संघटना आहे.
PFI Full Form पीएफआय म्हणजे काय? संघटनेवर कारवाई का केली जात आहे?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 26,2023 | 23:10 PM
WebTitle – Army jawan beaten, ‘PFI’ written on his back