हाथरस घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.देशभरात आंदोलने निदर्शने होत असून,विरोधी पक्षासह विविध पक्षीय नेते पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जात आहेत. राजरत्न आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पीडित कुटुंबाला बुद्ध धम्माचा मार्ग हाच आपलं पुढील आयुष्याचा उत्कर्ष मार्ग असल्याचे पटले.५० वाल्मिकी समाजातील कुटुबांमधील २३६ लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थिती बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
हाथरस येथील पीडित वाल्मिकी समाजाने देवी हटवून बुद्ध प्रतिमा प्रस्थापित केली
यावेळी त्यांनी देवीची प्रतिमा हटवून त्याठिकाणी बुद्ध प्रतिमा प्रस्थापित केली.
डीएम ऑफिसच्या समोर कचरा फेकून बदल घडणार नाही.
तर जो धर्म तुम्हाला कचरा उचलण्यास सांगतो तो धर्म सोडला पाहिजे.
असं ट्विट असणारा सदर व्हिडिओ राजरत्न आंबेडकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
बौद्ध धर्माची दीक्षा
गाझियाबादच्या करहेडा गावाच्या आसपासच्या परिसरातील वस्त्यांमध्ये राहणार्या ५० वाल्मिकी समाजातील कुटुबांमधील २३६ लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थिती बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आम्हाला प्रत्येक ठिकाणी दाबले जात असून कोठेही न्याय मिळत नसल्याचे दीक्षित लोकांचे म्हणणे आहे. याचे जीवंत उदाहरण हाथरस प्रकरण असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणानंतर वाल्मिकी समाजातील लोक दु:खी आहेत. याच कारणामुळे हिंदू धर्म सोडत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असल्याचे सांगितले.
१४ ऑक्टोबर या दिवशी करहेडा गावातील वाल्मिकी समाजातील लोकांची सभा झाली. या सभेत हाथरस प्रकरणाचा उहापोह करत आपण हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारायचा असा निर्णय घेण्यात आला. वाल्मिकी समाज हा आर्थिक ओढाताणीचे जीवन जगत आहे. या समाजाला प्रत्येक क्षेत्रात अत्याचाराचा सामना करावा लागतो. या समाजाच्या समस्या कोणीही सोडवू इच्छित नाही, असे वाल्मिकी समाजाचे म्हणणे आहे. या कार्यक्रमात बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सर्व दीक्षित लोकांना धर्मांतराचा दाखला देखील देण्यात आला.
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)