मथुरा: “जातीसोडून हिंदूंनी संघटित व्हावे, सर्वांसाठी राष्ट्र प्रथम असावे” वृंदावन, मथुरा येथे आयोजित दोन दिवसीय संघाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ चालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.वृंदावन, मथुरा येथे आयोजित दोन दिवसीय संघाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ चालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी लव्ह जिहाद, नूह हिंसा, मणिपूर हिंसाचार, धर्मांतरण यांसारख्या विषयांवर चर्चा केली.जातीसोडून हिंदूंनी संघटित व्हायला हवे, असे संघप्रमुख म्हणाले.राष्ट्रासाठी समर्पित असले पाहिजे. ते म्हणाले की, भारतातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रवादाशी जोडले पाहिजे, राष्ट्रवाद सर्वांसाठी प्रथम असला पाहिजे.
जाती पंडितांनी बनवल्या
या अगोदरच्या वक्तव्यात मोहन भागवत म्हणाले होते की, व्यवस्था जाचक होतात काटेरी बनतात हळूहळू त्यांच्या रूढी बनतात,त्या काळानुसार बदलण्याचे समाज सोडून देतो, आणि त्यामुळे एखादी व्यवस्था गळफास बनत असली तरी आपलं पोट भरण्याकरता ती हट्टाने चालवायचे आग्रह करणारी लोकं इथं आहेत हे सगळं आपल्याकडे झालं आहे,हे सगळं झाल्यावर आपल्याकडे परकीयांचे लक्ष गेले,या गोष्टी झाल्यामुळे परकीयांना तुकडे करून खायला वाव मिळाला.
जातिव्यवस्थेवर मोठं भाष्य करताना म्हणाले की, जाती या देवाने नाही तर जात पंडितांनी निर्माण केल्या आहेत. हिंदू समाज नष्ट होण्या योग्य आहे काय? दोष तर उघड उघड दिसत आहेत,आपल्याच लोकाना पशू प्रमाणे वागवतो. एकमेकांच्या प्रती भेद मानतो. स्वार्थासाठी आपल्या बांधवांना विकून टाकायला मागेपुढे पाहत नाही इतका खाली उतरलेला हा समाज,हा तर मरायच्याच लायकीचा आहे.याची परंपरा मोडीत काढायच्या लायकीची आहे. असं आहे की नाही हे पंडित लोक सांगू शकत नाही.ज्याना प्रचिती आहे तेच सांगू शकतात.
हिंदू आणि मुस्लिम सर्व समान आहेत
मोहन भागवत म्हणाले की, हिंदू आणि मुस्लीम सर्व समान आहेत.
काशीच्या मंदिराच्या विध्वंसानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून सांगितले की,
हिंदू असो वा मुस्लिम, आपण सर्व एकाच देवाची मुले आहोत.
हे जर तुम्हाला मान्य नसेल तर उत्तरेला तुमच्याशी लढायला यावे लागेल.
समाज आणि धर्माकडे द्वेषाने पाहू नका.. सदाचारी व्हा, धर्माचे पालन करा.
जाती भगवान ने नहीं, पंडितों ने बनाई.. – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 25,2023 | 14:48 PM
WebTitle – Hindus should unite irrespective of caste, Nation should be first for all” – Mohan Bhagwat