अखेर नूह हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगी ला अटक करण्यात आली आहे. noah-violence-case-bittu-bajrangi-detained तावडूच्या सीआयए पथकाने त्याला फरिदाबाद येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सीआयए युनिटने त्याला येथून पकडले आहे. हा तोच बिट्टू बजरंगी आहे ज्याने नुह हिंसाचाराच्या वेळी ब्रजमंडल शोभायात्रेपूर्वी सोशल मीडियावर अनेक प्रक्षोभक पोस्ट टाकल्या होत्या.बिट्टू बजरंगी च्या विरोधात नामनिर्देशित एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्याची अटक लवकरच होईल अशी शक्यता बऱ्याच दिवसांपासून होती. तूर्तास तो पकडला गेला आहे. नूह हिंसाचाराच्या संदर्भात, पोलिस त्याच्याकडून अनेक रहस्ये उघड करू शकतात.
खरं तर, नूह-गुरुग्राम हिंसाचार प्रकरणात मोनू मानेसर नंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे बिट्टू बजरंगी चं. 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीपूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो प्रक्षोभक वक्तव्य करताना आढळला होता.नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला पोलिसांनी फरीदाबादमधील घरातून अटक केल्याचे सांगितले जात आहे. बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह येथील सदर पोलिस ठाण्यात १४८,१४९,३३२, ३५३,१८६,३९५, ३९७,५०६,२५,५४,५९ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे बिट्टू बजरंगी
बिट्टू बजरंगी गौ रक्षक हे बजरंग दलाच्या फरिदाबाद युनिटचा प्रमुख असल्याचे कळते.
तो फरिदाबादचा रहिवासी असून त्याचे खरे नाव राजकुमार आहे. बिट्टू बजरंगी स्वतःला गोरक्षक म्हणवून घेतो.
नुह हिंसाचाराच्या वेळी तो त्याच्या प्रक्षोभक व्हिडिओमध्ये म्हणाला होता,
‘हे लोक (मुस्लिम)म्हणतील की सासरच्या घरी आलो आणि त्यांना भेटलोही नाही…
फुलांचे हार तयार ठेवा भाऊ सासरच्या लोकांना भेटायला येत आहेत. एकूण 150 गाड्या सोबत आहेत.”
या व्हिडिओमध्ये बिट्टू बजरंगी त्याच्या समर्थकांसोबत दिसत आहे. यानंतर तणाव वाढला होता.
नूहपासून सुरू झालेला हिंसाचार हरियाणातील फरिदाबाद, पलवल, होडल, गुरुग्राम आणि सोहना जिल्ह्यांमध्येही पसरला होता.
या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून, हरियाणा सरकारही चौकशीच्या फेऱ्यात आहे.
हिंसाचाराचा ठपका पोलिसांवरच लावला होता
नूहमध्ये हिंसाचार पसरल्यानंतर एका टीव्ही चॅनलशी बोलताना बिट्टू बजरंगी ने हिंसाचारासाठी पोलिसांनाच जबाबदार धरले.
त्याचवेळी त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, जर त्याच्या वक्तव्यामुळे दंगल भडकली,
तर दुसऱ्या बाजूचे लोक आधीच शस्त्रे घेऊन कसे काय होते?
मात्र, मिरवणुकीतील लोकांकडे तलवारी आणि बंदुका असल्याचे त्यांनी मान्य केले.
या तलवारी धार्मिक विधींसाठी असून मिरवणुकीत असणाऱ्या बंदुका या परवाना असलेल्या होत्या असं त्याने स्पष्ट केलं.
त्याच्या प्रक्षोभक व्हिडिओमुळे हिंसाचार घडल्याचा आरोप आहे का, असे विचारले असता,
तो म्हणाला की जर तसं असेल तर मुस्लिम अगोदरच शस्त्र घेऊन कसे काय होते?
विशेष म्हणजे 31 जुलै रोजी विहिंपच्या मिरवणुकीत नूहमध्ये हिंसाचार झाला होता.
यानंतर राज्याच्या अनेक भागात हिंसाचार पसरला होता.
या हिंसाचारात 2 होमगार्ड आणि एका इमामासह सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात आतापर्यंत 227 आरोपींना अटक करण्यात आली आहे
पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजार्निया यांनी अधिक माहिती देताना म्हटलं की, नूह हिंसाचारप्रकरणी 59 गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 227 जणांना अटक करण्यात आलीय.तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,आणि एका आरोपीला अटक देखील करण्यात आलीय. सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या ऑडिओ-व्हिडीओवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय.हळूहळू जिल्ह्यात परिस्थिती सामान्य होत आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 15,2023 | 21:02 PM
WebTitle – nuh-violence-case-bittu-bajrangi-detained