मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता शिवपुरी जिल्ह्यात दलित महिला सरपंच यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.जातीयवादी गुंडांनी अनुसूचित जातीच्या महिला सरपंचाला रस्त्यात गाठून चिखलात ढकलले आणि बुट व चप्पलने मारहाण केली. या प्रकरणी ३ जणांविरुद्ध ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Dalit woman sarpanch was beaten in Madhya Pradesh Shivpuri
जातीयवादी गुंडांनी चिखलात ढकलून बुट व चप्पलने मारहाण केली
शिवपुरीच्या कोलारस जिल्हा पंचायत अंतर्गत पहाडी नावाची एक ग्रामपंचायत आहे. गीता जाटव या येथील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिला सरपंच आहेत. या महिला सरपंचांनी जातीयवादी गुंडांचे आदेश पाळण्यास नकार दिल्याने जातीयवादी गुंडांनी त्यांना चिखलात ढकलले आणि बुट व चप्पलने मारहाण केली.सरपंच महिलेला संपूर्ण गावातील लोकांसमोर जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आलं. तेंदूआ पोलीस स्टेशन प्रभारी मनीष जदौन यांनी सांगितले की, धर्मवीर यादव, रामवीर यादव आणि मुलायम यादव या तिघा आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि एससी एसटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
दलित महिला सरपंच गीता जाटव यांचा मोठा मुलगा गोपाळ जाटव हा काही कामानिमित्ताने खरई येथे गेला होता,त्यावेळी जातीयवादी आरोपी धर्मवीर यादव ने त्याला गाठले, धर्मवीर यादव ने गोपालला माझ्या कागदपत्रांवर तुझ्या सरपंच आईची सही घेऊन देण्याविषयी बोलला,त्यावेळी गोपालने त्याला कोणत्या कागदावर आणि कशासाठी सही हवी आहे,असे विचारले असता धर्मवीर म्हणाला की, मी एका माणसाला मारणार आहे, तुला आईची सही घ्यावी लागेल. गोपालने सही घेऊन देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या धर्मवीर ने गोपालला बेदम मारहाण केली. त्यानंतर गावात पोहोचल्यानंतर गोपालने आई गीता जाट यांना हा सर्व प्रकार सांगितला.
जातीयवाद्यांनी सरपंच महिलेला बुट व चप्पलने मारहाण देखील केली
सरपंच गीता जाटव यांनी आपल्या मुलाला झालेल्या मारहाणीच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आरोपी धर्मवीर यादव च्या घरी जात होत्या,त्या घरी जात असतानाच त्यांना धर्मवीर यादव,रामवीर यादव आणि मुलायम यादव यांनी घेरले. तिघांनीही त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत “आम्ही तुला सरपंच केलंय तर सरंपची आम्हीच करणार.” आम्हाला सही करून दे,त्यावर गीत जाटव यांनी सही करण्यास नकार दिल्याने जातीयवादी गावगुंड धर्मवीर यादव,रामवीर यादव आणि मुलायम यादव या तिघांनी गीता यादव यांना शिवीगाळ करत चिखलात ढकलून दिले,इतकेच नाहीतर या जातीयवाद्यांनी त्यांना बुट व चप्पलने मारहाण देखील केली.
आम्ही सरपंच बनवलं,आमच्या आदेशानुसारच वागावं लागेल
पीडित महिला सरपंच गीत जाटव यांनी सांगितले की, धर्मवीर यादव गेल्या वर्षभरापासून त्यांना सतत त्रास देत होता.
आम्ही तुला सरपंच बनवलं आहे त्यामुळे आमच्या आदेशानुसारच वागावं लागेल, अशी धमकी तो देत होता.
दलित सरपंच महिलेवर अशाप्रकारे जातीयवादी मानसिकतेतून
शिवीगाळ,मारहाण,छळ करण्याच्या अनेक घटना भारतात घडत असतात,
जातीयवादी किड्यांना एकतर महिला पुढे गेलेली पाहावत नाही,
त्यात ती दलित असेल तर त्यांच्या पुरुषी अहंकाराला आणखी इंगळ्या डसतात आणि त्यामुळे ही किडे असे वळवळ करत राहतात.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 19,2023 | 20:58 PM
WebTitle – Dalit woman sarpanch was beaten in Madhya Pradesh Shivpuri