रायगड मध्ये माळीन सारखी दुर्घटना, ईरशालवाडी येथे दरड कोसळून 50 हून अधिक कुटुंब अडकली, 4 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच
रायगड: सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात पाणी साचण्याच्या बातम्या समोर येताहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केलीय. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईरशालवाडी गावावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे.यामध्ये 50 जण अडकल्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्याचबरोबर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घटनास्थळी पोहोचले आहेत. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.latest update Raigad IrshalWadi landslide
आतापर्यंत 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
माहिती देताना रायगड पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत २२ जणांना वाचवण्यात आलं आहे.मात्र अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. latest update Raigad IrshalWadi landslide सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 हून अधिक अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. आम्हाला एनडीआरएफ, स्थानिक लोक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत आहे. ईरशालवाडी च्या सखल भागात वसलेल्या आदिवासी वस्तीवर दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. हा परिसर नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळील चौक गावापासून ६ किमी अंतरावर असलेला आदिवासी भाग आहे.
बचावकार्यासाठी आणखी दोन पथके पोहोचली
एनडीआरएफने सांगितले की, रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इरसालवाडी येथे दरड कोसळून भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे. दरड कोसळलेल्या भागात लोक अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. या कारवाईत सहभागी होण्यासाठी मुंबईहून आणखी दोन पथके रवाना झाली आहेत. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
IMD ने रायगडसाठी अलर्ट जारी केला आहे
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी पाच ते सहा घरांचे नुकसान टाळण्यात यश आले आणि एका शाळेचेही नुकसान झाले नाही.
राज्याच्या काही भागात संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD)
गुरुवारी रायगडसाठी “रेड अलर्ट” जारी केला आहे.
भूस्खलनाच्या घटनेनंतर बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (NDRF) मदत करण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना केले आहे.
अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपड करावी लागत आहे
रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितलं की, ही घटना मध्यरात्री घडली आणि उपविभागीय अधिकारी आणि खोपोलीचे तहसीलदार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले, जिथे त्यांना सात जण सुखरूप बाहेर पडत असल्याचे दिसले, असे टाईम्सने वृत्त दिले आहे. म्हसे म्हणाले, “घटनास्थळी पोहोचण्यासाठी दोन तासांचा ट्रेक (उंच चढाई)करावा लागतो, जे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे.”
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20,2023 | 08:08 AM
WebTitle – latest update Raigad IrshalWadi landslide