सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला सरकारी बस च्या कंडक्टर ने हिरवी टोपी घातल्याबद्दल प्रश्न विचारत आहे. ती गणवेशाचा भाग नसल्याचे सांगत आहे. अशा परिस्थितीत, जर त्याला त्याच्या धर्माचे पालन करायचे असेल तर त्याने ते आपल्या घरात किंवा मशिदीत करावे.असं ती दरडावून सांगते,सोबत ती आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असते,काही वेळच्या वादावादी नंतर बस कंडक्टर आपली हिरवी टोपी काढून टाकतो. महिला चित्रीकरण बंद करते. यावर आता सोशल मिडियात दोन गट पडले असून एक गट म्हणत आहे,सरकारी कर्तव्य करत असताना आपल्या धार्मिक प्रथा परंपरा घरी ठेवल्या पाहिजेत,दुसऱ्या गटाचे मत आहे.ही गोष्ट हिंदू धर्मातील व्यक्तींना लागू आहे?
सार्वजनिक ठिकाणी धर्म नको
हा व्हिडिओ सुमारे 11 दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) ची आहे. व्हिडिओमध्ये कन्नड भाषेत संभाषण सुरू असल्याचे कळते. हा संभाषणाचा व्हायरल व्हिडिओ 1 मिनिट 42 सेकंदांचा आहे. यामध्ये बस कंडक्टरने हिरवी नमाजी टोपी घातलेली दिसत आहे. याबाबत एका महिला प्रवाशाने त्यांना विचारले की ड्युटीवर असताना गणवेशासह टोपी घालण्याची परवानगी आहे का? ती महिला कंडक्टरला म्हणते, “सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही तुमच्या घरात किंवा मशिदीत तुमचा धर्म आचरणात आणा, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नको.”
कंडक्टर टोपी काढून खिशात ठेवतो.
महिलेकडून गणवेश आणि कायद्याबाबत प्रश्न विचारल्यावर कंडक्टर सांगतो की, तो वर्षानुवर्षे ही टोपी घालूनच ड्युटी करत आहे.
मात्र आजपर्यंत त्यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही.
मात्र महिला कर्तव्य बजावत असताना गणवेश कायद्याचे पालन करण्यावर ठाम आहे. यानंतर कंडक्टर टोपी काढून खिशात ठेवतो.
वादविवादादरम्यान, कंडक्टर देखील म्हणतो की टोपी घालण्याची परवानगी असू शकते.
यावर महिला प्रवासी म्हणते की, तुम्हाला नियम नीट माहीत नाहीत.
व्हिडिओचा एंगल पाहता तो महिला प्रवाशानेच बनवला असल्याचे दिसते. त्यात तिचा चेहरा दिसत नाही.
त्यामात्र बसमधिल इतर अनेक प्रवासी दोघांची वादावादी ऐकताना दिसत आहेत.
TOI च्या वृत्तानुसार, BMTC अधिकाऱ्यांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मात्र त्यांनी म्हटलं की , हा व्हिडिओ जुना असून त्याबद्दल माहिती समजली आहे.
यासोबतच बीएमटीसीमधील ड्रेस कोड अनेक दशकांपासून लागू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 13,2023 14:10 PM
WebTitle – Muslim bus conductor was wearing a green cap; the female objected removed