रशिया मध्ये सैन्याची बंडखोरी,सत्ता पालट? पुतिन च्या पाठीत खंजीर खुपसणारा वॅगनर ग्रुप काय आहे? जाणून घेऊया.अनेक दिवसांपासून युक्रेन युद्धात अडकलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. रशिया कडून आलेल्या अपडेटनुसार, खाजगी लष्करी कंपनी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाविरुद्ध बंड पुकारण्याची घोषणा केली आहे. वॅगनर ग्रुप चे स्वतःचे सैन्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनर ग्रुप (Russia Wagner Group) रशियाच्या वतीने युक्रेनमध्ये युद्ध लढत होता.पण आता त्याचे सैन्य रशियाच्या सीमा ओलांडून रोस्तोव्हपर्यंत पोहोचले आहे. या बंडानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रीगोझिनविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या बंडखोरीसाठी प्रिगोझिन ला 20 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
रशिया मध्ये बंडखोरी केलेला वॅगनर ग्रुप काय आहे?
सध्या संपूर्ण जगाच्या नजरा रशियाकडे लागल्या आहेत. युक्रेन जिंकण्याच्या हव्यासापोटी त्याच्यासमोर कोणते नवे आव्हान उभे राहिले आहे? हा वॅगनर ग्रुप काय आहे?
याबद्दल जाणून घेताना असं आढळून येतं की वॅगनर ग्रुपचा (Wagner Group) प्रथम उल्लेख 2014 मध्ये झाला होता. वॅग्नर ग्रुपने रशियन सैन्याला क्रिमिया ताब्यात घेण्यामध्ये मदत केली होती. तेव्हापासून हे नाव मोझांबिक, लिबिया, सीरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (CAR), माली, सुदान आणि मादागास्कर सारख्या देशांमध्ये देखील दिसू लागले आहे. यापैकी बरेच देश गृहयुद्धांशी झुंज देत आहेत, तर उर्वरित देश स्थिरतेच्या संकटाचा सामना करत आहेत.वॅगनर ग्रुप या देशांमध्ये लढाऊ आणि प्रशिक्षक पाठवून संबंधित बाजूस मदत करतो. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात. सीरियातील तेल विहिरींच्या ताब्याच्या बदल्यात, वॅगनर समूहाला एकूण उत्पादनाच्या 25 टक्के रक्कम मिळते. CAR सरकारने 2017 मध्ये रशियाकडून मदत मागितली होती. मग वॅगनरचे लढवय्येही रशियन सैन्यासोबत पाठवण्यात आले. तेथे त्यांनी सोने, हिरे आणि युरेनियमच्या खाणींवर कब्जा केला आहे.
हिटलरचा आवडता संगीतकार होता – रिचर्ड वॅगनर
गेली अनेक वर्षे वॅगनर ग्रुपचे रहस्य दडले होते. या ग्रुपबद्दल वेगवेगळ्या कथा चालायच्या. वॅगनरच्या मागे दोन नावांचा उल्लेख होता. एक दिमित्री उत्कीन होते, ज्यांनी रशियाच्या लष्करी गुप्तचर संस्था GRU मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून काम केले होते. आणि दुसरा येवगेनी प्रिगोझिन होता. रिपोर्ट्सनुसार, उत्किन हिटलरला आपला आदर्श मानतात. हिटलरचा आवडता संगीतकार होता – रिचर्ड वॅगनर.
असं बोललं जातंय की याच संगीतकाराच्या नावाने उत्कीनने नेटवर्कला वॅगनर ग्रुपचे नाव दिले. उत्किन बर्याच काळापासून सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. दुसरा मास्टरमाइंड प्रिगोझिन हा (Wagner Group) वॅगनर ग्रुपचा आर्थिक पाठीराखा असल्याचे सांगण्यात आले. प्रीगोझिनवर इंटरनेट रिसर्च एजन्सी ‘ट्रोल फॅक्टरी’ला निधी दिल्याचाही आरोप आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ऑनलाइन बनावट मोहीम
या एजन्सीने 2016 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ऑनलाइन बनावट मोहीम चालवली होती.
याच आधारावर अमेरिकेने प्रीगोझिन आणि त्यांच्या कंपन्यांवर अनेकवेळा निर्बंध लादले होते.
प्रीगोझिनने हे आरोप खोटे म्हटले. नंतर त्यांनी आरोप मान्य केला होता.
2019 मध्ये, पुतिन यांना वॅग्नर समूहाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पुतिन म्हणाले होते, काही खाजगी सुरक्षा कंपन्या तिथे काम करत आहेत, पण त्यांचा रशियन सरकारशी काहीही संबंध नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2022 आला. पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. सुरुवातीच्या प्रगतीनंतर रशियन सैन्याला माघार घ्यावी लागली. रशियन सैन्य अनेक आघाड्यांवर कमकुवत होत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर वॅगनर ग्रुपने आघाडी घेतली. खरंतर रशिया मध्ये खाजगी लष्करी गट तयार करणे किंवा चालवणे यावर बंदी आहे.
तरीही प्रिगोझिनने वॅगनर ग्रुपची स्थापना केली अन हा ग्रुप कोणत्याही अडथळ्याशिवाय कार्यरत राहिला.
त्याने रशियन सैन्यासोबत युद्धही केले आहे.
वॅगनर ग्रुपमध्ये बहुतांश दोषी कैदी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, (Russia Wagner Group) वॅगनर ग्रुपमध्ये किमान 50,000 फायटर आहेत. यातील बहुतांश दोषी कैदी आहेत. त्यांना रशियातील तुरुंगातून भरती करण्यात आले. सप्टेंबर 2022 मध्ये, प्रीगोझिनचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यात तो ऑफर देत होता, जर तुम्ही या युद्धात रशियाला साथ दिली तर तुमचे सर्व गुन्हे माफ केले जातील.प्रीगोझिनने हेलिकॉप्टरने अनेक तुरुंगांना भेट दिली आणि हजारो गुन्हेगारांना त्याच्या खाजगी सैन्यात भरती केले. हे सर्व पुतिन यांच्या संमतीशिवाय शक्य नव्हते. हळूहळू वॅगनर ग्रुप नावारूपास येऊ लागला. 2022 च्या शेवटी, प्रिगोझिनने वॅगनरचे अस्तित्व स्वीकारले.
जेव्हा प्रीगोझिनने सप्टेंबरमध्ये वॅगनर ग्रुप ची स्थापना केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे वर्णन ‘रशियाचा आधारस्तंभ’ असे केले. ऑक्टोबरच्या सुरूवातीस, सरकारने त्याला खरा नागरिक आणि एक माणूस म्हटले ज्याचे हृदय रशियासाठी धडधडत आहे.वॅग्नर ग्रुप आणि पुतिन यांच्यातील संबंध बराच काळ लपवून ठेवण्यात आले होते.पूर्वी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत गुप्त लष्करी गट म्हणून वॅग्नर ग्रुप काम करत होता. मग रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्व काही बदलले. येवगेनी प्रिगोझिन ने कबूल केलं की त्यानेच वॅगनर ग्रुप ची निर्मिती केली. आता हा गट रशियन सैन्यापेक्षा विरोधातच उभा ठाकला आहे.
येवगेनी प्रीगोझिन यांच्यावर सशस्त्र बंडाचा आरोप
रशियाने Russia Wagner Group ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्यावर सशस्त्र बंडाचा आरोप केला आहे.
दरम्यान, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येवगेनी प्रिगोझिनचा दावा आहे की
त्यांचे सैन्य रशियाच्या दक्षिणेकडील सीमा भागात घुसले आहे. प्रीगोझिनच्या म्हणण्यानुसार,
वॅगनरच्या सैनिकांनी रोस्तोवमधील दक्षिणी लष्करी जिल्हा इमारतीचा ताबाही घेतला आहे.
रशियात सत्तापालट होण्याची शक्यता आहे.
येवगेनी प्रीगोझिन कोण आहे?
“पुतिनचा स्वयंपाकी” म्हणून प्रसिद्ध झालेले येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म 1961 मध्ये लेनिनग्राड (सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला.
वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी, येवगेनी अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड बनला आणि त्याच्यावर हल्ला, दरोडा आणि फसवणुकीचा आरोप होता.
त्यानंतर न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला 13 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती,तरीही त्याची 9 वर्षात सुटका झाली होती.
पाठीत खंजीर खुपसला – पुतिन
रशिया चे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना वॅगनर ग्रुप चे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी केलेल्या ‘सशस्त्र उठावाच्या प्रयत्ना’बद्दल सतत माहिती दिली जात आहे. संरक्षण मंत्रालय, अंतर्गत व्यवहार मंत्रालय आणि नॅशनल गार्ड राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना यासंबंधीचे अपडेट्स सतत देत आहेत.
राष्ट्राला संबोधित करताना “पाठीत खंजीर खुपसला अशी जळजळती प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली.पुतिन यांनी बंडखोरांना देशद्रोही म्हटले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल,कुणीही सुटणार नाही,असेही म्हटले आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी युक्रेनमधील बाखमुत येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी क्रेमलिनला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यात वॅगनर ग्रुप चे अनेक सैनिक मारले गेले आहेत.
25,000 लोकांची एक तुकडी “मरायला तयार आहे”
त्याच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ संदेशांत, प्रीगोझिन म्हणाले,
त्यांनी (रशियन सैन्याने) आमच्या शिबिरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, आमचे मोठ्या संख्येने सैनिक, आमचे सहकारी मारले. जो कोणी प्रतिकार करेल त्याला धोका मानले जाईल आणि ताबडतोब नष्ट केले जाईल. आपल्याला ही समस्या संपवायची आहे. हा लष्करी उठाव नाही तर न्यायाचा मोर्चा आहे.
प्रिगोझिन ने असंही म्हटलंय की , 25,000 लोकांची एक तुकडी “मरायला तयार आहे”,
दुसरीकडे रोस्तोव मधिल रूसी अधिकाऱ्यांनी लोकांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 जून रोजी केलेल्या भाषणात बंडखोरांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगितले.
पण ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन सरकारविरोधात सत्तापालट करणार का? पुतिन सत्तेतून पायउतार होणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
माहिती आवडल्यास व्हाट्सेप/फेसबुक ग्रुपवर जरूर शेअर करा.
मोदी अमेरिका दौरा दरम्यान या गोष्टी ज्या भारतीय मिडियाने तुम्हाला दाखवल्या नाहीत, दाबून टाकल्या
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढली: भाजप नेता
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 24 JUN 2023, 21:58 PM
WebTitle – What is the Wagner group stabbing Putin in the back?