गुजरात : आपल्या देशातील तथाकथित उच्चजातीयांना नेमकं काय झालंय तेच कळत नाही,कधी मिशी ठेवली तर राग येतो,चांगले कपडे घातले राग येतो,घोड्यावर बसलं राग येतो,आता तर क्रिकेट च्या बॉल ला स्पर्श केला म्हणून दलित व्यक्तीचा थेट अंगठा छाटला गेलाय. फारच भयानक मानसिक विकृती निर्माण होत चालली आहे.पीडित व्यक्तीच्या अवघ्या आठ वर्षाच्या लहानग्या पुतण्याने क्रिकेट च्या टेनिस बॉल स्पर्श केला म्हणून रविवारी उत्तर गुजरातच्या पाटण जिल्ह्यात सात तथाकथित उच्च जातीयवाद्यानी एका दलित व्यक्तीचा अंगठा तलवारीने कापला.
सोमवारी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कुलदीपसिंह राजपूत, सिद्धराजसिंह, राजू उर्फ राजदीप दरबार, जशवंतसिंह राजपूत, चाकुबा लक्ष्मणजी आणि महेंद्रसिंह आणि एक अनोळखी व्यक्ती अशी सहा आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर दंगल करणे, धोकादायक शस्त्रांनी इजा करणे, यासोबत अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. सिद्धपूर तालुक्यातील काकोशी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं जाणून घ्या..
एफआयआरनुसार, पीडित किरीट दह्याभाई परमार चा आठ वर्षांचा पुतण्या आयडी सेलिया हायस्कूल ID Selia high school या शाळेच्या क्रिकेट पाहात होता.तथाकथित उच्चजातीयवादी गुंड तिथे क्रिकेट खेळत होते,त्यावेळी बॉल किरीट परमार यांच्या लहानग्या पुतण्याजवळ येऊन पडला. त्याने तो उचलून देण्याचा प्रयत्न केला.अर्थातच त्याचा स्पर्श बॉलला झाला.त्यावेळी आरोपींपैकी एक कुलदीपसिंह याने पीडित परमार यांच्या पुतण्याला जाती वाचक शिवीगाळ केली ज्यावर परमार यांनी आक्षेप घेत आरोपीला तसे करण्यापासून रोखले.ही घटना ४ जून रोजी घडली.
लहानग्याचे काका किरीट परमार यांनी तथाकथित उच्चजातीयवाद्यांच्या जातीय अत्याचाराला विरोध केला.
त्यानंतर हे प्रकरण त्यावेळी शांत करण्यात आले.पण त्याच दिवशी संध्याकाळी सात जणांच्या टोळक्याने
हॉकी तलवार अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन मुलाचा काका किरीट परमार आणि त्यांच्या भावावर खुनी हल्ला केला.
एका आरोपीने मुलाचे काका किरीट परमार यांचा अंगठा छाटून त्यांना गंभीर जखमी केले.
किरीट यांना तत्काळ पालनपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून त्याना अहमदाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शेवटी हा प्रश्न उरतोच की हे प्रकार भारतीय समाजात कधी थांबणार आहेत? तुम्हाला काय वाटतं?
शहीद अक्षय भालेराव हत्या प्रकरण सोशल मिडियात लिहिणाऱ्यांची चौकशी प्रकाश आंबेडकर
रेल्वे अपघात ; 35 पैशांमध्ये 10 लाखांचा रेल्वे प्रवास विमा Train Travel Insurance
8 वर्षीय मुलीवर बलात्कार, 80 वर्षीय पुजारी ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 06, JUN 2023, 18:30 PM
WebTitle – Dalit man’s thumb cut off for touching cricket ball, two arrested