अहमदाबाद: गुजरातमधील गांधीनगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी दलित आणि आदिवासी समाजातील सुमारे 50000 लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला.
पोरबंदर येथील महान अशोक बुद्ध विहार येथील बौद्ध भिक्षु प्रज्ञारत्न यांनी लाखो उपस्थितांना ‘दीक्षा’ दिली.
स्वयं सैनिक दल (एसएसडी) या राजकोटस्थित दलित संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या आधी एक मेगा रॅली होती ज्यात हजारो हिंदू-दलित आणि आदिवासी.लोकांचा सहभाग होता.
50000 हिंदू दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला
गांधीनगर मेळाव्यात बौद्ध धम्म स्वीकारताना २२ प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आल्या. 66 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म स्वीकारताना भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित करोडो लोकांना 22 प्रतिज्ञा पाळण्याची शपथ दिली होती. या 22 प्रतिज्ञा मूलत: बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीला हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक कर्मकांड अंधविश्वासांपासून दूर राहण्याच्या सूचना करतात,तसेच सदधम्म सन्मार्ग आणि वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविण्याचा प्रयत्न करतात.
“या धम्म रॅलीसाठी लाखो लोक उपस्थित होते, तर आमच्या मेळाव्यात शेकडो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे धर्मांतर कायदेशीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात आधीच अर्ज सादर केले आहेत, तर इतर लवकरच त्यांचे अर्ज सादर करतील,” असे मीडिया संयोजक अश्विन परमार यांनी सांगितले. SSD, ही एक दलित संघटना आहे ज्यात कोणतेही विशिष्ट नेतृत्व किंवा पद श्रेणी नाही.
या प्रसंगी अनेक वक्त्यांनी असा दावा केला की जाती-आधारित भेदभावामुळे
हिंदू-दलित आणि आदिवासींना हिंदू धर्म सोडावा लागत जात आहे.
याच कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला.
गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून धर्मांतर होत आहे.
राज्यात आजही दलित मुलाला घोड्यावर बसण्याची किंवा मिशा वाढवण्याची परवानगी नसल्याच्या तक्रारी
धर्मांतरितांनी माध्यमांकडे केल्या आहेत.त्यामुळे सततच्या भेदभाव जाच आणि अपमानाला कंटाळून हिंदू धर्माचा त्याग करणेच पसंत करतात.
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 15,2023 20:56 PM
WebTitle – 50000 Hindu Dalits embrace Buddhism in Gujarat