तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त हैदराबाद येथे १२५ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. हैदराबादमधील हा पुतळा आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा आहे.India’s tallest statue of Ambedkar unveiled in Telangana
डॉ.आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे उद्घाटन, नवीन सचिवालय इमारत संकुलाचे उद्घाटन आणि इतर बाबींवर चर्चा केली.
या सोहळ्यास महाराष्ट्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी राज्याने आमंत्रित केलेल्या बौद्ध भिक्खूंनी आयोजित केलेल्या बौद्ध विधी संस्कार प्रार्थनेत मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर सहभागी झाले होते.
तेलंगणा राज्यामधिल भारतातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर
पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आदरांजली वाहण्यात आली.
भारतातील सर्वात उंच पुतळा कुठे आहे?
भारतातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा हैदराबादच्या प्रसिद्ध हुसेन सागर तलावाच्या काठावर राज्य सचिवालयाशेजारी हा पुतळा उभा आहे.सुमारे 465 टन वजनाचा हा पुतळा 50 फूट उंचीच्या पायथ्याशी बसवला आहे आणि डॉ बी आर आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे प्रदर्शन करणारी एक संग्रहालय आणि गॅलरी आहे.
मुख्यमंत्र्यांनी, 14 एप्रिल 2016 रोजी डॉ बीआर आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त,
तेलंगणा सरकार शहरातील सचिवालयाला लागून असलेल्या एनटीआर गार्डनमध्ये त्यांचा 125 फूट उंच पुतळा बसवणार असल्याची घोषणा केली.
तेलंगणा सरकारने डॉ बी आर आंबेडकर यांचे नाव दिलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीजवळ हा पुतळा आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात महिलांसाठी काय तरतुदी केल्या
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 14,2023 17:15 PM
WebTitle – India’s tallest statue of Ambedkar unveiled in Telangana