अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून भारत आणि चीन दोघांमध्ये पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.द हिंदू वृत्तपत्राच्या बातमीनुसार, चीन ने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली असून तशी घोषणाही केली आहे. चीनने या ११ ठिकाणांची यादी आणि त्यांची चीन च्या भाषेतील ‘प्रमाणित भौगोलिक नावे’ही जारी करण्यात आली आहेत.
चीन ने नावे बदलली या यादीमध्ये दोन निवासी क्षेत्रे, पाच पर्वत शिखरे, दोन नद्या आणि दोन इतर क्षेत्रांचा समावेश आहे. यादीसोबत नकाशाही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
इतर वृत्तपत्रांनीही ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली आहे.
चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सच्या हवाल्याने वर्तमानपत्रांनी हे वृत्त लिहिले आहे.
गेल्या सहा वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. चीन अरुणाचल प्रदेशच्या या भागाला झांगनान प्रांत म्हणतो आणि यापूर्वी 2017 मध्ये देखील झांगनानची सहा नावे ओळखली गेली होती.
2021 मध्येही 15 ठिकाणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर या बदललेल्या नावांप्रकरणी भारत सरकारने चीनचा निषेध केला होता.
भारत सरकारने म्हटले होते की, “नावाचा शोध लावून जमिनीवरील वस्तुस्थिती बदलणार नाही
आणि अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील.”
अरुणाचल प्रदेशचा ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्र चीनने स्वतःचा असल्याचा दावा केला आहे.
अरुणाचल प्रदेशाबाबत चीन याआधीही सातत्याने दावे करत आहे आणि भारत प्रत्येक वेळी त्याचा ठामपणे इन्कार करत आहे.
चीन अरुणाचल प्रदेशला आपली जमीन सांगतो आणि त्याला दक्षिण तिबेट म्हणतो.
आपला दावा बळकट करण्याच्या उद्देशाने ते भारतातील वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यांदरम्यान आपले आक्षेप व्यक्त करत असतात.
गेल्या काही वर्षांत अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिक चिनी सैनिकांसोबत आमनेसामने आल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत.
बार्टी फेलोशिप दीड महिना उपोषण ; मुख्यमंत्री म्हणतात माहिती नाही.
मंत्रालयाबाहेर एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न;एक मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 04,2023 16:15 PM
WebTitle – China changed names of 11 places in Arunachal Pradesh