मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.सदर पीडित महिलेचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वारंवार विनंती करूनही न्याय मिळत नसल्याने महिलेने सोमवारी दुपारी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, शीतल गाडेकर असे मृत महिलेचे नाव आहे. ती राज्यातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी होती. काल घडलेल्या घटनेनंतर गाडेकर यांना शहरातील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत नवी मुंबई येथील संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जमिनीच्या वादात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत या दोन्ही महिलांनी काल मंत्रालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मंत्रालय गेटवर आत्महत्या काय प्रकरण आहे?
सोमवारी दुपारी १.१५ च्या सुमारास दोन महिलांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटवर जाऊन सर्वांसमोर विष प्राशन केले.
या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणाहून मंत्रालयात आल्या होत्या.
शीतल गाडेकर धुळे आणि संगीता डवरे या नवी मुंबईहून मंत्रालयात पोहोचल्या होत्या.
एमआयडीसीतील एका जागेबाबत आपली फसवणूक झाल्याचा आरोप मृत महिला शीतल यांनी केला होता.
या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महिलेने तीन वेळा मंत्रालयात जाऊनही काही उपयोग झाला नाही.
यामुळे त्यांनी मंत्रालयाबाहेर विष प्राशन केले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुसरी महिला, नवी मुंबईची संगीता डवरे, ज्या मृत्यूशी झुंज देत लढत आहे,
त्यांच्या पोलीस कर्मचारी असणाऱ्या पतीला चुकीच्या उपचारांमुळे अपंगत्व आले होते,
उपचार करणाऱ्या संबंधित त्या तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला जात होत्या,
मात्र रुग्णालयाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की,
“तिला यासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध तक्रार नोंदवायची होती मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल न केल्याचा आरोप तिने केला.
सोमवारी दुपारी १.१५ वाजता गाडेकर मंत्रालयाच्या मुख्य गेटवर पोहोचल्या.तिथे अगोदरच असलेल्या डवरेही तिच्यासोबत सामील झाल्या.
दोघांनीही स्कार्फने तोंड झाकले होते. त्यांनी आणलेल्या बाटल्यांमधून कीटकनाशक सेवन केले,
” मरीन ड्राइव्ह पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, या दोघी एकमेकांना ओळखत होते की नाही हे त्यांना माहीत नाही आणि चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या पथकाने दोघांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले जेथे गाडेकर यांचा मृत्यू झाला आणि डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
“रुग्णावर आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती गंभीर आहे,”असे जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ.पल्लवी सापले यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या भूखंडाबाबत न्याय मागणाऱ्या गाडेकर यांच्याबाबत विचारले असता, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “त्यांचा आत्महत्येने मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे. शिंदे सरकार जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी या विषयावर माझ्या विभागाला पत्र लिहिले होते का याबाबत मी चौकशी करणार आहे.”
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 40 वर्षीय व्यक्ती ज्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तो राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेचा सदस्य आहे.रमेश माेहिते असं या इसमाचे नाव असून ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून त्यांनी जनता जनार्दन प्रवेशद्वारावर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. “ते त्यांचे मानधन (आर्थिक सहाय्य) दरमहा 1,500 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात निदर्शने करत होते. सोमवारी काही आंदोलकांनी मंत्रालयाजवळ आत्मदहन करण्याचे संकेत दिले. पोलीस सतर्क होते,” असे एका पोलिसाने सांगितले. . पोलिसांनी त्याला नोटीस बजावल्यानंतर त्याचे समुपदेशन करून सोडून देण्यात आले.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 29,2023 16:00 PM
WebTitle – Three suicide attempts on the same day outside Mantralay; one death