ईव्हीएमच्या EVM मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून अनेकदा संशय व्यक्त केला गेला आहे.तसेच निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेते. त्याकडे बोट दाखवतात असेही दिसून आले आहे.यावेळी मात्र निवडणुकीच्या अगोदरच विरोधी पक्षाने आक्षेप घ्यायला सुरुवात केलीय.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी बोलताना म्हटलं की, सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे जाऊन याबाबत चर्चा करणार आहेत.
कपिल सिब्बल म्हणाले, “जर निवडणूक आयोगाने EVM ईव्हीएमबाबत योग्य उत्तर दिले नाही, तर आम्ही सर्व विरोधी राजकीय पक्ष पुढे काय करायचं याचा विचार करू. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाशी बोलू. आपल्या देशातच ईव्हीएमचा वापर का होतोय? इतर देशात ईव्हीएमचा वापर होत नाही.असा गंभीर प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
बैठकीमध्ये कोण कोण होते ?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार Sharad pawar यांच्या घरी झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल,
समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि कपिल सिब्बल, काँग्रेसचे दिग्विजय सिंह आदी नेते सहभागी झाले होते.
खरं तर शरद पवार यांनी बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावर चर्चेचे निमंत्रण दिले होते.
मात्र, तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) एकही सदस्य या बैठकीला उपस्थित नव्हता.
शरद पवार यांच्या पत्रात काय?
शरद पवारांनी या पत्रात लिहिलं होतं की,मुख्य निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आश्वासन दिले होते.
ते म्हणाले, “चीप असलेलं कोणतंही मशीन हॅक केलं जाऊ शकतं आणि हे नाकारलं जाऊ शकत नाही.आपण लोकशाहीला असे हायजॅक होऊ देऊ शकतो का? जे हे करत आहेत, त्यांना हे करू देता येईल का? निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष करण्यासाठी, आपण एकत्र बसून आयटी तज्ज्ञ आणि क्रिप्टोग्राफर काय म्हणतात ते ऐकले पाहिजे.”
EVM हॅक केलं जाऊ शकतं का?
भाजपच्या शैलेन्द्र प्रधान आणि अनिल चावला यांनी EVM हॅक संदर्भात मध्यप्रदेश उच्चन्यायालयात 2009 साली याचिका दाखल केली होती.भाजपचे नेते किरीट सोमय्या यानीही अनेकदा ईव्हीएम संदर्भात विरोध करताना आयोगाला लिहिले होते.आता मात्र ते समर्थन करत आहेत. त्यामुळे EVM हॅक केलं जाऊ शकतं का? हा प्रश्न, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बदलत्या भूमिकांमुळे आजही स्पष्ट झालेला नाही.याबाबत एकदा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे.यासोबतच विरोधी पक्ष व नागरिकांच्या मनातील संशय सुद्धा कायमचा दूर केला पाहिजे.यासाठी आयोगाने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 23,2023 21:25 PM
WebTitle – opposition party’s aggressive regarding EVM Kapil Sibal raises the question