Hamara Prasad Arrested हैदराबाद – 2014 नंतर देशातील वातावरण कमालीचे विषाक्त झाल्याचे दिसत असून देशातील सहिष्णुता संपली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रीय दलित सेना नावाच्या संघटनेच्या प्रमुखाने अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक असं लाजिरवाणं विधान केलं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर आज हयात असते तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असत्या, असा व्हिडीओ दलित सेनेचे संस्थापक हमारा प्रसाद याने जारी केला आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली तशी हत्या मी केली असती, असे स्वत:च्या जीवाला धोक्यात घालणारे वक्तव्य हमारा प्रसाद याने केले आहे.व्हिडिओ समोर आल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत हमारा प्रसादला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तेलंगणात राहणाऱ्या आणि स्वत:ला हिंदू-दलित नेता म्हणवून घेणाऱ्या हमारा प्रसाद याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हमारा प्रसाद याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रीडल्स इन हिंदूइझम’ या पुस्तकाबद्दल भाष्य केलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ.आंबेडकरांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असा मूर्खपणाचा दावा करत नथुराम गोडसेने जशी महात्मा गांधींची हत्या केली तशी हत्या मी केली असती, असं हा हमारा प्रसाद म्हणाला आहे. तेलंगणामधिल बसपा नेते आरएस प्रवीण कुमार यांनी हा व्हिडिओ शेअर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी मुसक्या आवळल्या
या प्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी हमारा प्रसाद विरुद्ध आयपीसी कलम १५३ए आणि ५०५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आता पोलीस हमारा प्रसाद ची चौकशी करत आहेत. हमारा प्रसाद स्वत:ला राष्ट्रीय दलित सेना नावाच्या संघटनेचा हिंदू दलित प्रमुख असल्याचा दावा करतो. व्हिडिओमध्ये हमारा प्रसाद याने डॉ.आंबेडकरांवर वारंवार टीका करत त्यांना जीवे मारले असते अशी धमकी दिली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर हा दलित हिंदू आज कोणत्या उकिरड्यावर कचरा खात असता
हाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते साक्यनितीन यांनी दिली आहे.
जैन विद्यापीठ स्किट प्रकरण: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; तक्रार दाखल.
मोहन भागवत जातीप्रथा निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घेणार का ?
जाती भगवान ने नहीं, पंडितों ने बनाई.. – मोहन भागवत
अदानी हिंडेनबर्ग अहवाल : व्यवहारात पारदर्शकता आवश्यक
संभाजी भिडे गडकोट मोहीम वादात,दुर्गंधी पसरली; कारवाईची मागणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 11,2023 21:56 PM
WebTitle – If Dr. Ambedkar was alive he would have been shot Hamara Prasad Arrested