आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची एक मुलाखत अनेक कारणांसाठी सध्या चर्चेत आहे. या मुलाखातीत मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली आहेत, पण त्यांचा समलैंगिक LGBTQ समुदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशेषतः लक्षात घेण्यासारखा आहे.
भागवत यांनी या मुलाखतीत अशा दोन गोष्टी सांगितल्या, ज्या या मुद्द्यावर संघाच्या आतापर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या आहेत.
प्रथम, ट्रान्सजेंडर लोक किंवा समलैंगिक संबंध हे भारतीय परंपरांसाठी नवीन किंवा अद्वितीय नाहीत.
महाभारतासारख्या ग्रंथातही समलिंगी संबंधांचा उल्लेख
समलैंगिक संबंधांच्याबद्दल अधिक माहिती देताना आरएसएस प्रमुख भागवत यांनी थेट महाभारताचा दाखला दिले आहे. महाभारतासारख्या ग्रंथातही समलिंगी संबंधांचा उल्लेख येतो. असं म्हणत जरासंधाच्या दोन सेनापतींचे (हंस आणि डिंभक) उदाहरण देत ते म्हणाले की, पारंपारिकपणे, ट्रान्सजेंडर्सना भारतीय समाजात स्वतःचे स्थान आणि भूमिका आहे, जे समाजात त्यांच्या स्वीकाराचं उदाहरण आहे, असं त्यांनी म्हटलंय.
दुसरे म्हणजे भागवतांनी प्राण्यांमधील अशा संबंधांचाही उल्लेख केला. ते स्वत: पशुवैद्यक राहिले आहेत. ते म्हणाले की, अशा संबंधांना कोणत्याही प्रकारे अनैसर्गिक म्हणता येणार नाही.भागवतांच्या या दोन्ही गोष्टी या अर्थाने महत्त्वाच्या आहेत की केवळ संघच नाही तर त्याच्याशी वैचारिकदृष्ट्या जवळ असलेल्या अनेक संघटना आणि व्यक्ती आपापल्या स्तरावर समलिंगी संबंधांवर आक्षेप घेत आहेत.
समलैंगिक मुद्यावर संघाच्या दृष्टिकोनात बदल
2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा (असे संबंध) गुन्हेगार कक्षेच्या बाहेर ठेवले तेव्हाही संघाकडून असे सांगण्यात आले होते की,
सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आम्ही हा गुन्हा मानत नाही, परंतु समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक असल्याने आम्ही त्याचे समर्थनही करत नाही.
तसेच असे संबंध स्वीकारत नाहीत.
मात्र,आता आरएसएस प्रमुख मोहन भागवतच याचं समलैंगिक संबंधांचं (Gay LGBT rss take ) समर्थन करताना दिसत आहेत.
साहजिकच या पाच वर्षांत संघाच्या दृष्टिकोनात झालेला हा बदल बरेच काही सांगून जातो.
संघाचे समीक्षक टीकाकार संघ हा आधुनिक मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करत असतात,
परंतु संघाचे आधुनिक मूल्ये आणि बदलत्या विचारांबद्दल खुलेपणा असल्याचे RSS प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीवरून दिसून येते.
असे विचारले जाऊ शकते की एखाद्या संस्थेच्या अंतर्गत घडामोडींनी उर्वरित समाजाची चिंता का करावी.
सध्याच्या संदर्भात याची दोन कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, आरएसएस ही भाजपची मातृसंस्था असून सध्या ती सत्तेवर आहे.
दुसरं म्हणजे, आरएसएस संघाच्या दृष्टिकोनातील हा बदल सर्व प्रकारच्या परस्परविरोधी प्रवृत्ती, विचार
आणि प्रक्रियांचा साक्षीदार असूनही आपला समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचं दिसून येतं. हे आश्वासक आहे.
सिमी ला भारत मुस्लिम राष्ट्र बनवायचंय,म्हणून बंदी -केंद्र
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 20,2023 19:59 PM
WebTitle – Mahabharata quote by Bhagwat of RSS on homosexual gay issue