उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील जालौन येथील झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आटा टोल प्लाझावर बजरंग दलाच्या नेत्याने आपण दंबग बजरंग दल नेता असून टोल भरण्यास नकार दिला. यावेळी त्याची पत्नी आणि महिला टोल कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झालं,बजरंग दलाच्या नेत्याच्या पत्नीची दबंगगिरी काही चालली नाही. रस्त्याच्या मधोमध टोल कर्मचाऱ्यांनी महिलेला झिंज्या पकडून बेदम मारहाण केली.
तत्पूर्वी महिलेने टोल भरण्यास नकार देत रस्त्यातील बॅरिकेडिंग काढण्यास कर्मचाऱ्यांना सांगितलं.टोल कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडिंग न काढल्याने महिला स्वत: गाडीतून खाली उतरली आणि ती ब्रेकर स्वत: काढू लागली. महिला टोल कर्मचाऱ्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
एका वृत्त वाहिनेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी दुपारी घडली. आरोपी महिला ओराईहून कानपूरला कारने (क्रमांक – UP16 BF 7802) जात होती.
गाडीला फास्ट टॅग नसल्यामुळे त्या टोलनाक्यावरील बॅरिकेडिंग उघडली गेली नाही.
या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
माहिती मिळताच पोलीस पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
व्हिडिओमध्ये एक कार जवळ येत असल्याचे दिसत आहे. टोलवर उभे असलेले कर्मचारी ही कार थांबवण्याचा प्रयत्न करतात,
त्यावेळी कारमधून एक महिला (बजरंग दल नेता पत्नी) खाली उतरते आणि बॅरिकेडिंग हटवण्यास सुरुवात करते.
टोलचे कर्मचारी तीला थांबवतात पण महिला बॅरिकेडिंग हटवत राहते,
ही महिला पुरुष टोल कर्मचाऱ्यांचे ऐकत नसल्याने तिथे महिला टोल कर्मचाऱ्याला घटनास्थळी बोलावले जाते. महिला टोल कर्मचारी समजावत तिला जागेवरून हटवण्याचा प्रयत्न करतात, पण ती ऐकत नाही. महिलेचा (बजरंग दल नेता पत्नी) आवाज वाढल्यावर आणखी २-३ महिला टोल कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले जाते. ते लोक तिला समजावतात पण ती कोणाचेच ऐकत नाही. एका महिला कर्मचाऱ्याने तिचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने टोल कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ती त्याला केस धरत खाली पाडते.
पीडित टोल कर्मचाऱ्यानी अधिक माहिती देताना सांगितलं की, “आरोपी महिलेने त्यांना खूप मारहाण केली. तसेच धमकी दिली. कर्मचारी नियमाप्रमाणे टोल घेण्याचे काम करत होते. त्यांच्यावरऑन ड्यूटी असताना हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आलीय. मारहाणीत डोक्याला आणि हातालाही दुखापत झाली आहे. त्याच्यावरही उपचार झाले पाहिजेत.” असं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय.
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 03,2022, 12:26PM
WebTitle – Bajrang Dal leader refuses to pay toll His wife was beaten on the street by pulling her hair