गुजरात: रविवारी संध्याकाळी गुजरात च्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीत केबल पूल कोसळल्याने किमान 32 लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाल्याले आहेत, असे स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक अहवालानुसार, गुजरात मधिल हा केबल पूल नूतनीकरणानंतर पाच दिवसांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आला होता.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, 70 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले असून
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची सुटका करण्यात आली
त्यापैकी बहुतांश लोकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. बचावकार्य सुरू आहे.
पूल कोसळल्यानंतर प्रशासन स्थानिकांच्या मदतीने नदीत पडलेल्या लोकांची सुटका करत आहे.
राज्य सरकारने या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल लवकरच मोरबीला रवाना होणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) दोन तुकड्याही मोरबीहून रवाना झाल्या आहेत.
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी या दुर्घटनेबाबत चर्चा केली.
प्रधानमंत्र्यांनी परिस्थितीचे बारकाईने आणि सतत निरीक्षण करण्यास सांगितले आहे.
तसेच प्रभावित झालेल्यांना शक्य ती सर्व मदत देण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, सीएम पटेल यांनीही ट्विटरवर माहिती दिली आणि यंत्रणेकडून मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती दिली. जखमींवर तात्काळ उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्क साधत असल्याचे सांगितले.
“पीएम मोदींसोबतचा पुढील कार्यक्रम आटोपून मी गांधीनगरला पोहोचत आहे. राज्यमंत्री गृह यांना घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यात मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य आपत्ती निवारण दलासह (एसडीआरएफ) जवानांना बचाव कार्यासाठी जमवण्यात आले आहे,” असे पटेल म्हणाले.
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30,2022, 21:23 PM
WebTitle – VIDEO: Cable bridge collapses in Gujarat, 400 people in water, some hanged