दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा, नेट्टा डिसोझा आणि इतरांनी भाजप नेत्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर “खोटे, तीक्ष्ण आणि आक्रमक वैयक्तिक हल्ले” करण्याचा कट रचला होता, त्या किंवा त्यांची मुलगी या गोवा येथील बार च्या मालक नाहीत. तसेच आरोप केल्याप्रमाणे त्याने कधीही तेथील रेस्टॉरंट किंवा बारसाठी परवान्यासाठी अर्ज केला नव्हता.
उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी केलेली विधाने “काल्पनिक स्वरूपाची आणि दुर्भावनापूर्ण हेतूने” इराणी यांची सार्वजनिक चेष्टेचा विषय बनवण्याच्या आणि भाजपच्या नेत्याची आणि त्यांच्या मुलीची नैतिक चारित्र्य आणि सार्वजनिक प्रतिमा बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेली आहेत.
गोवा बार विवाद :काँग्रेस नेत्यांना कोर्टाचा धक्का
महिला आणि बालविकास मंत्री इराणी यांनी काँग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या दाव्यात आपल्यासमोर ठेवलेल्या कागदपत्रांची दखल घेत उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. उच्च न्यायालयाचा २९ जुलै रोजीचा आदेश सोमवारी न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला. न्यायालयाने आपल्या आदेशात काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना दिवाणी मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले होते.
न्यायालयाने त्यांना केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलीवर लावण्यात आलेल्या आरोपांवरील ट्विट आणि इतर सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी आपल्या 14 पानांच्या आदेशात म्हटले आहे की, “मी रेकॉर्डवर ठेवलेली विविध कागदपत्रे पाहिली आहेत, विशेषत: गोवा सरकार, उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने २१ जुलै २०२२ रोजी जारी केलेली कारणे दाखवा नोटीस पाहिली जी कुणी अँथनी डीगामा ला उद्देशून आहे, ना की फिर्यादी (इराणी) किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उद्देशून.”
“रेकॉर्डवर उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता, असे दिसून येते की
फिर्यादी किंवा त्यांच्या मुलीच्या नावे असा कोणताही परवाना कधीही जारी केलेला आढळून येत नाही,”
त्या म्हणाल्या,फिर्यादी आणि त्यांची मुलगी हे रेस्टॉरंटचे मालक नाहीत.
फिर्यादीने हे देखील प्रथमदर्शनी सिद्ध केले आहे की त्यांनी (इराणी) किंवा त्याच्या मुलीने कधीही परवान्यासाठी अर्ज केला नाही.’
“गोवा बार रेस्टॉरंट किंवा ज्या जमिनीवर रेस्टॉरंट अस्तित्वात आहे ती दोन्हीही फिर्यादी किंवा त्यांच्या मुलीच्या मालकीची नाही,
गोवा सरकारने जारी केलेली कारणे दाखवा नोटीसही फिर्यादी किंवा त्यांच्या मुलीच्या नावावर नाही,”असे न्यायालयाने म्हटले आहे.
फिर्यादीनेही आपल्या प्रतिज्ञापत्रात या गोष्टींना दुजोरा दिला आहे.
निराधार आणि खोटे आरोप लावल्याबद्दल केंद्रीय मंत्री इराणी यांनी तिच्या
आणि त्यांच्या 18 वर्षीय मुलीवच्यावतीने काँग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, फिर्यादी भारत सरकारमध्ये मंत्री म्हणून सन्माननीय पदावर कार्यरत असल्याने आणि त्यांच्या सार्वजनिक पदाचे स्वरूप पाहता, सार्वजनिक डोमेनमध्ये त्यांच्याबद्दलची कोणतीही माहिती अत्यंत चर्चिली जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते.त्यानी पुढे असेही म्हटले आहे की, “प्रतिवादी क्रमांक 1 ते 3 (काँग्रेस नेते) यांनी एकमेकांच्या संगनमताने आणि इतर व्यक्ती आणि संघटनांनी फिर्यादीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि तीच्या मुलीवर खोटे, तीक्ष्ण आणि आक्षेपार्ह वैयक्तिक हल्ले करण्याचा कट रचला आहे, ज्याचा सामान्य उद्देश फिर्यादी आणि तीच्या मुलीची प्रतिष्ठा, नैतिक चारित्र्य आणि सार्वजनिक प्रतिमा यांना बदनाम करणे, आणि नुकसान करणे हे आहे.
उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की जर काँग्रेस नेते त्यांचे ट्विट काढले नाहीत तर ट्विटरला तसे करावे लागेल.
7वा वेतन आयोग अपडेट: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी भेट?
New Wage Code: खाजगी क्षेत्रात आठवड्यातून 4 दिवस काम – 3 दिवस सुट्टी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 01,2022, 21:30 PM
WebTitle – Smriti Irani daughter Goa Bar Controversy: Court shock to Congress leaders, defamation conspiracy