मुंबई: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अज्ञानातून द्वेष बाळगणारे सोशल मिडियात आक्षेपार्ह लेखन करून समाजात द्वेष निर्माण करून असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या विरोधात कायद्याने धडा शिकवण्याचे धोरण भीम अनुयायांनी आरंभले असल्याचे दिसते,या अगोदर पुण्यातील एका स्त्री ला अशाच पद्धतीने कायद्याची आवश्यकता आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याची किंमत याबद्दल जाणीव करून देण्यात आली होती,आताही कर्जत तालुक्यातील नेरळ कोडीवळे येथील आशा अनंत राणे नामक एक स्त्रीला पोलिसांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याची किंमत काय असते याबद्दल जाणीव करून देण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण ?
आशा अनंत राणे नामक स्त्री ने तिच्या फेसबुक अकाऊंट वरून 20 जून रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत हीन भाषेत मजकूर लिहिला होता.यासोबतच बौद्ध, दलित,हरिजन अशा समाजाविषयी देखील अत्यंत हीन भाषेचा वापर करत लोकाना बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी चिथावणीयुक्त भाषेचा प्रयोग करत पोस्ट शेअर केल्या होत्या.विशेष म्हणजे तीने पोस्ट करताना आपला पत्ता निवासस्थान सहित साग्रसंगीत माहिती सुद्धा फेसबुक पोस्टमध्ये शेअर केली होती,ही पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर तालुक्यातील कर्जत नेरळ येथील सजग आंबेडकरी नागरिकांनी शेकडोच्या संख्येने पोलिस स्टेशनला धडक दिली. सामाजिक कार्यकर्त्या जया बनसोडे आणि इतर महिला सहकारी यांनी नेरळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.
अशा समाजद्रोही कृत्यामुळे समाजातील वातावरण दूषित होते.यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतले.तसेच समाजमाध्यमावरून तीने केलेली पोस्ट हटवून तिचे खातेही डीएक्टीव्हेट करण्यात आले आहे.
आशाच्या भावाने सुद्धा केलेली अशीच पोस्ट
धक्कादायक बाब म्हणजे आशा अनंत राणे हीचा भाऊ प्रल्हाद राणे यानेही अशाच प्रकारची पोस्ट 2 जून रोजी
फेसबुक या समाज माध्यमात पोस्ट केल्याचे समोर आले आहे.यामुळे हे कुटुंब कोणत्यातरी अजेंड्यावर काम करत आहे का?
यामागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत? कुणी यांना असे करण्यास निर्देश दिले होते का? हे पोलिसांनी तपासात शोधणे गरजेचे आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन्ही पोस्ट गलीच्छ अशा चुकीच्या मराठी भाषेत करण्यात आल्या आहेत.
ज्यामध्ये मराठी भाषेच्या अनंत चुका आहेत.एका ठिकाणी कटार हिंदू असा उल्लेख सुद्धा आढळून आला आहे.
खरतर यांना कट्टर असं लिहायचं होतं.देशात सध्या असं वातावरण हेतूपूर्वक तयार केलं गेलं आहे.
ज्यामुळे तरुण पिढी दिशाहीन आणि इतरांचा द्वेष करण्यास प्रवृत्त होते आहे. याकडे सत्ताधारी पक्षाने (खरंतर तेच जास्त जबाबदार आहेत.) गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.सोबतच न्यायपालिकेने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे,जेणेकरून समाजमाध्यमांचा वापर समाजात जातीय धर्मीय तेढ निर्माण करण्यास होणार नाही,आणि समाजात फुट पडणार नाही.विशेष काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे.आपले तरुण सुशिक्षित मुलं सोशल मिडियाचा वापर कशासाठी करत आहेत? ते समाजात तेढ निर्माण करून आपलं करियर आपली शिक्षण संस्कार वेशीवर टांगत नाहीत ना? याबद्दल चिंता करण्याची वेळोवेळी तपासण्याची गरज आहे.अन्यथा नंतर मानसिक त्रास आणि समाजात अहवेलना वाट्याला येते. नाचक्की होतेच पण करियर बरबाद होते.
प्रियकराच्या भावासोबत 20 दिवसांचे प्रेम..मुलीने केला आई-वडिलांचा खून
दलित मुलीला शाळेत जाण्यापासून रोखले,बॅग हिसकावली,सात जणांना अटक
मासिक पाळी प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिस तर्फे वृक्षारोपण
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 30,2022, 22:20 PM
WebTitle – police-detained-asha-anant-rane-who-wrote-offensive-articles-about-dr-babasaheb-ambedkar-out-of-caste-hatred