लादी पाव साठी साहित्य –
2 कप मैदा (240ml चा cup)
त्यात चवीनुसार मीठ टाकून.अंदाजे अर्धा tsp
पाककृती –
एका भांड्यात 1 कप कोमट दूध घ्यायचं, त्यात 1 tbsp साखर घोळवून घ्यायची( गोड आवडत असेल तर जास्त साखर.२ चमचे)
साखर विरघळली की 1 tsp dry yeast घालून, mix करुन ,15 मिन झाकून ठेवून द्यायचं.
15 मिन नी yeast दुधात फुलून येईल,
मग हे मिश्रण मैद्यात टाकून मळायचं, थोडं थोडं कोमट दूध घालून मळून घ्यायचं, मऊ ,सैलसर मळायचं,
मळताना मध्ये चिकट होईल, तरी मळत राहायचं ,5,7 मिनिटांनी 1 tbsp buttr घालून मळायचं , मग smooth गोळा बनून येईल.
एकीकडे oven 3,4 मिन heat करून घ्यायचं.. ( रिकामाच)
Oven बंद करून वरचा मैद्याचा गोळा नीट झाकून एका मोठया भांड्यात गरम केलेल्या ओव्हन मध्ये ठेऊन द्यायचा ..
1 तास ( oven बंद आहे)
एका घंट्याने तो गोळा तिप्पट झालेला असतो
आता समान 8 गोल गोळे करून ग्रीस केलेल्या baking tray मध्ये ठेवायचे, मध्ये अंतर ठेवायचं.
आणि वरच्या बाजूला ब्रशने दूध लावायचं.. आणि हा tray परत गरम ठिकाणी 20 ते 30 मिन ठेवायचा.
इकडे 10 मिन oven preheat करायचा 180 वर
आणि मग tray ठेवून 180 वरच 20 मिन bake करायचं, convection mode वर.
प्रत्येक oven चं वेगवेगळे असेल,
Ifb microwave ला 160 वरच bake होतात साधारण 20 मिनिटात.
काही oven ला 200 ℃पण लागतात.
चेक करून बेक करायचं,
(वरून brown झालं की लक्षात येतं ते)
लादी पाव काढून लगेच ओल्या कापडाने झाकून ठेवायचं,( कारण वरून कडक असतं ते सॉफ्ट करण्यासाठी)
by डॉ अमिता संजय
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)