मुझफ्फरपूर: Assistant Professor Lalan Kumar Case : 23 लाख 82 हजार रुपयांचा धनादेश परत करणाच्या वृत्तानंतर चर्चेत आलेले असिस्टंट प्रोफेसर ललन कुमार यांनी आता यू-टर्न घेतला आहे. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांची अनुपलब्धता आणि वर्ग न घेतल्याचे कारण देत आपले सगळे वेतन परत करण्याचा निर्णय घेतला,तसा चेकच त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला पाठवला होता,मात्र आता त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सर्व विधाने मागे घेतली आहेत. त्यांनी यासंदर्भात एक पत्र जारी करून संपूर्ण गोष्ट लिहिली आहे. पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मी दु:खी आहे. निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो.
पत्रात ललन कुमार यांनी म्हटलय की – “मला विनंतीपूर्वक हे म्हणायचं आहे की मी माझ्या बदलीसाठी 6 वेळा अर्ज केला होता परंतु आजपर्यंत त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही, त्यामुळे मी खूप दुःखी होतो. मी काही निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे. मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही आणि भावनेच्या भरात मी अर्जासोबत माझ्या पगाराच्या पूर्ण रकमेचा चेक दिला.”
ललन कुमार यांनी पत्रात पुढे म्हटलंय की – “चेक सादर केल्यानंतर, वरिष्ठ लोक आणि सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मला समजले की असे करणे योग्य नाही.महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या व्यवस्थेनुसार आचरण अपेक्षित आहे. यापुढे मी सर्वतोपरी प्रयत्न करेन की भविष्यात कोणतीही भावनेच्याभरात पावले उचलणार नाही. या संदर्भात माझ्याकडून जी काही लेखी किंवा तोंडी विधाने जारी केली गेली आहेत, मी ती सर्व विधाने परत घेतो.”
ललन कुमार यांनी फोन बंद करून ठेवलाय
या प्रकरणानंतर सहाय्यक प्राध्यापक डॉ.ललन कुमार यांचा फोन बंद आहे.
त्यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. ते कॉलेजलाही येत नाहीत.
इकडे हे प्रकरण अंगलट आल्यानंतर सोशल मीडियावरही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
वेतन परत करण्याच्या ‘प्रामाणिकपणा’मागचे खरे कारण खुद्द प्राध्यापकसाहेबच सांगत आहेत.
खरंतर, प्रोफेसरसाहेबांच्या प्रामाणिकपणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली,
लोकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी लिहिलं की मला या व्यक्तीला मनापासून सलाम करायचा आहे,
तर काहींनी लिहिलं की यामागचा गुप्त अजेंडा काहीतरी वेगळाच आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील साहेबगंज येथील सीएन कॉलेजमधील इतिहासाचे प्राध्यापक राजू रंजन प्रसाद म्हणतात, “गुन्हा केल्याशिवाय कोणाचाही पगार घेता येत नाही. अशा वसुलीची तरतूद नाही. डॉ.ललन कुमार यांनाही हा नियम साहजिकच परिचित असेल.तरीही चेकद्वारे वेतन परत करण्यामागचे खरे सत्य काय? यावर राजू रंजन पुढे सांगतात की त्यांचा मुख्य हेतू पीजी कॉलेजमध्ये बदली करण्याचा होता. याबाबत अनेकदा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी निराशाच आली.
अशा परिस्थितीत पगार परत करण्याचे प्रकरण समोर आणून आपला खरा हेतू पूर्ण करण्यासाठी
शेवटचे हत्यार म्हणून त्याचा वापर केल्याचे मानले जात आहे.
पीजी कॉलेजमध्ये शिकवण्याच्या इच्छेमागेही प्रा. राजू रंजन यांचे मत वेगळे आहे.
इथं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळते, तसेच यासोबतच इतर काही गरजा देखील पूर्ण करता येतात.
ललन कुमार यांनी ज्या खात्यातून 23 लाखांचा धनादेश दिला, त्या खात्यात केवळ 970
बिहारचे असिस्टंट प्रोफेसर ललन कुमार यांनी कॉलेज प्रशासनाला दोन वर्षे 9 महिन्यांच्या पगारात मिळालेले 23 लाख रुपये वेतन परत करण्याची ऑफर दिली होती, त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते.महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षणासाठी येत नाहीत, त्यामुळे पगार घेण्याचा त्यांचा अधिकार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. आश्चर्याची बाब म्हणजे २३ लाखांचा धनादेश कापून घेतलेल्या ललन कुमार यांच्या बँक खात्यात एक हजारांपेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे. तुम्हाला नेमकं आकड्यात सांगायचं म्हणजे अवघे 970 रुपडे आहेत.
तीन वर्षात सहा वेळा बदली
डॉ.ललन कुमार यांनी म्हटलं होतं की, गेल्या तीन वर्षात त्यांची 6 महाविद्यालयांमध्ये बदली करण्यात आली होती,
मात्र सर्व महाविद्यालये अशी आढळून आली की जिथे मुले शिकायला येत नाहीत.
3 वर्षे झाली तरी त्यांनी एकाही विद्यार्थ्याला शिकवले नाही आणि मी कुणाला शिकवले नाही,
तर मला शिकवण्यासाठी शासनाकडून वेतन घेण्याचा अधिकार नाही.
माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचे म्हणणे ऐकून मी माझा तीन वर्षांचा पगार विद्यापीठाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मला 25 सप्टेंबर 2019 ते मे 2022 पर्यंत मिळालेला संपूर्ण पगार विद्यापीठाला परत करायचा आहे.
माझ्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे, त्यामुळे मी इच्छा असूनही माझी जबाबदारी पार पाडू शकत नाही.
त्यामुळे काम न करता पगार घेणे हे माझ्या नीतिमूल्यांच्या विरुद्ध आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
कन्हैयालाल च्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याकडून कोटी रुपये ट्रान्सफर
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 08, 2022, 20:06 PM
WebTitle – The U-turn of the Assistant Professor Lalan Kumar who returned the salary of Rs 23 lakh, only Rs 970 in his account