उत्तर प्रदेश : PUBG हत्याकांड : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 16 वर्षीय मुलाने आईची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मुलाला PUBG खेळण्याचे व्यसन होते आणि त्याची आई त्याला ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखत असे. या रागातून अल्पवयीन मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने आईवर गोळी झाडली. वडील आर्मीचे शिपाई असून सध्या पश्चिम बंगालमध्ये पोस्टींगवर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी झाडल्यानंतर ही महिला कित्येक तास जिवंत होती.
आई वारली की नाही हे पाहण्यासाठी मुलगा पुन्हा पुन्हा दरवाजा उघडायचा.
PUBG हत्याकांड : अंगाचा थरकाप उडवणारी कबुली जबाब
चौकशीत अल्पवयीन मुलाने सांगितले की, ‘गोळी लागून रक्तस्राव झालेली मम्मी कित्येक तास जिवंत होती आणि आई मेली आहे की नाही हे पाहण्यासाठी मी पुन्हा पुन्हा दरवाजा उघडत होतो. सकाळी तपासायला गेलो, तरीही आई जिवंत होती. काही तासांनंतर तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य वेळी माहिती मिळाली असती तर महिलेचा जीव वाचू शकला असता.
मुलाने कबुलीजबाब देताना सांगितले की, ‘शनिवारी 8 ते 9 वाजेपर्यंत माझ्या आईने मला खूप मारहाण केली.
मग ती झोपायला गेली. यानंतर मी माझ्या वडिलांचे पिस्तूल कपाटातून काढले आणि आई झोपली असताना तिच्यावर गोळ्या झाडल्या.
‘आई म्हणायची की कापून फेकून देईन, विष देईन’
अल्पवयीन आरोपी म्हणाला, ‘घरात माझी चूक नसतानाही तरीही दोष माझ्यावर यायचा. एकदा त्याला 10 हजार रुपये मिळाले, त्यानंतर ते घेऊन तो घर सोडून निघून गेला होता.आई म्हणायची तुला कापून फेकून देईल, विष देईन. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर टोमणे मारायची. बाहेर खेळायला गेल्यावरही तिला राग यायचा. नाराज व्हायची.तीची वारंवार रोकटोक चालू असायची. सकाळ-संध्याकाळ मला रोकटोक आणि टोमणे सुरू असायचे.
मुलाने गेल्या शनिवारी आपल्या आईवर गोळ्या झाडल्या होत्या आणि तिचा मृतदेह दोन दिवस खोलीत कोंडून ठेवला होता.
घटनेच्या वेळी मुलाची 9 वर्षांची बहीण देखील घरी होती, परंतु मुलाने तिला धमकावले आणि तिला दुसर्या खोलीत बंद केले
आणि मृतदेहातून येणारा दुर्गंध लपवण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर केला.
मात्र वातावरणातील उष्णतेमुळे दुर्गंधी पसरायला लागली होती,यामुळे शेजाऱ्यांना संशय येईल अशी भीती मुलाला वाटत होती,मात्र शेजाऱ्यांना हे लक्षात आलंच आणि त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या त्याच्या वडिलांना याबाबत मंगळवारी माहिती दिली.
‘फोन येताच समजलं, यानं आईला मारलं’, वडिलांनी सगळी कथा सांगितली
वडील म्हणाले, ‘मुलावर त्यांना अगोदरपासून संशय होता तो आईचं काहीतरी बरं वाईट करू शकतो,
याची मला सतत काळजी वाटत असायची,यामुळे मला लगेच लखनौला यायचे होते. मात्र, रजा मिळत नव्हती.
घरात वीज बिलाची नोटीस आली आणि कनेक्शन तोडल्याची चर्चा होती, त्याबद्दल पत्नी खूप नाराज होती.
सैन्यात तैनात असलेल्या अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांनी सांगितले, ‘मी रविवारी फोन केला तेव्हा मुलाने फोन उचलला आणि सांगितलं की आई बिल भरण्यासाठी गेली आहे, त्यामुळे मला वाटले की कदाचित ती खरच बिल भरण्यासाठी गेली असावी. मग मी एकदा फोन केला आणि मुलगा म्हणाला, मम्मी शेजारी गेली आहे. त्यानंतर मी म्हणालो की तुझ्या बहिणीशी बोलू दे, तेव्हा तो म्हणाला की नंतर देतो तिला फोन,त्यानंतर माझं कुणाशी बोलणं झालं नाही.
वडिलांचा कॉल, PUBG साठी धक्कादायक हत्याकांड
वडील पुढे म्हणाले, ‘मला आतून भीती वाटत होती, नक्की काय घडलं आहे? कुठेतरी, काही अनुचित घडले नाही ना, मुलाचे हेतू बरेच धोकादायक होते. मग मी त्याच्या ट्युशन टीचरला फोन केला की माझ्या घरी जाऊन बघा, काय परिस्थिती आहे? ट्यूशन टीचर घरी पोहोचले त्यांनी पाहिलं की घर बंद आहे, बाहेर स्कूटी देखील उभी नव्हती, त्यांचा कुत्रा नेहमी आत असतो, परंतु तो बाहेर बांधलेला दिसला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि फोन करणार होतो तेव्हा अचानक माझ्या मुलाचाच फोन आला आणि तो म्हणाला की कोणीतरी मागून घरात घुसून आईला मारले आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 10 2022, 11 : 20 AM
WebTitle – PUBG Murder: Son killed mother, he kept checking, is a mother alive?